Home /News /sport /

IND vs SA 1st ODI : 'लॉर्ड' ठाकूरचं शेवटच्या बॉलला अर्धशतक, तरी टीम इंडियाचा पराभव

IND vs SA 1st ODI : 'लॉर्ड' ठाकूरचं शेवटच्या बॉलला अर्धशतक, तरी टीम इंडियाचा पराभव

तीन भारतीयांच्या अर्धशतकानंतरही टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये (India vs South Africa 1st ODI) 31 रननी पराभव झाला आहे. शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) मॅचच्या अखेरच्या बॉलला एक रन काढत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

पुढे वाचा ...
    पार्ल, 19 जानेवारी : तीन भारतीयांच्या अर्धशतकानंतरही टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये (India vs South Africa 1st ODI) 31 रननी पराभव झाला आहे. शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) मॅचच्या अखेरच्या बॉलला एक रन काढत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. ठाकूरने 43 बॉलमध्ये नाबाद 50 रनची खेळी केली. यात 5 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. याशिवाय शिखर धवनने (Shikhar Dhawan) 79 आणि विराट कोहलीने (Virat Kohli) 51 रन केले. 50 ओव्हरमध्ये टीम इंडियाने 8 विकेट गमावून 265 रन केले. लुंगी एनगिडी, तबरेझ शम्सी, एनडिले पेहक्लुक्वायो यांना प्रत्येकी 2-2 विकेट, तर मार्करम आणि महाराजला 1-1 विकेट घेण्यात यश आलं. या विजयासोबतच दक्षिण आफ्रिकेने 3 वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बऊमाने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. 17.4 ओव्हरमध्ये आफ्रिकेने 67 रनवर 3 विकेट गमावल्या होत्या, पण टेम्बा बऊमा आणि रस्सी व्हॅन डर डुसेन यांच्या शतकांमुळे दक्षिण आफ्रिकेला 50 ओव्हरमध्ये 296/4 पर्यंत मजल मारता आली. रस्सी व्हॅन डर डुसेनने 96 बॉलमध्ये नाबाद 129 रन केले, यात 9 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. तर टेम्बा बऊमाने 143 बॉलमध्ये 110 रन केले. बऊमाने 8 फोर लगावल्या. केएल राहुलची कॅप्टन म्हणून ही पहिलीच वनडे होती, पण आपल्या पहिल्याच वनडेमध्ये राहुलच्या पदरी निराशा आली. याआधी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातच जोहान्सबर्ग टेस्टमध्ये विराटला दुखापत झाल्यामुळे राहुलला टेस्ट टीमची पहिल्यांदाच कॅप्टन्सी मिळाली, त्या टेस्टमध्येही भारताला पराभव पत्करावा लागला होता.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Team india

    पुढील बातम्या