Home /News /sport /

IND VS PAK : भारताच्या युवा स्टारचा अफलातून कॅच, VIDEO पाहून युवराज आणि रैनाला विसरून जाल!

IND VS PAK : भारताच्या युवा स्टारचा अफलातून कॅच, VIDEO पाहून युवराज आणि रैनाला विसरून जाल!

पाकिस्तानने दिलेल्या 173 धावांच्या आव्हानाचा 'यशस्वी' पाठलाग करत भारताने वर्ल्डकप फायनलमध्ये धडक मारली आहे.

    पॉचेफस्ट्रूम, 04 फेब्रुवारी : अंडर 19 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये (U 19 world cup 2020) पाकिस्तानने दिलेल्या 173 धावांच्या आव्हानाचा 'यशस्वी' पाठलाग करत भारताने वर्ल्डकप फायनलमध्ये धडक मारली आहे. भारताचा सलामीवर यशस्वी जयस्वाल आणि दिव्यांश सक्सेना यांच्या दमदार भागीदारीच्या जोरावर भारताने पाकिस्तानवर (ind vs pak) 10 विकेट्सने विजय मिळवला. पाकिस्तानने दिलेल्या 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालच्या शतकाच्या आणि दिव्यांश सक्सेनाच्या अर्धशतकाच्या जोरावर 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. जयस्वाल आणि दिव्यांश सक्सेना यांनी पाकच्या गोलंदाजांना एकही संधी दिली नाही. दोघांनी सावधपणे खेळ करत भारताचा विजय साजरा केला. जयस्वालने नाबाद 105 तर दिव्यांशने नाबाद 59 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांच्या अचूक माऱ्याबरोबरच दिव्यांश सक्सेना याने घेतलेल्या एका सुपर कॅचमुळे या सामन्याला खरी कलाटणी मिळाली. पाकचा सलामीवीर मुहम्मद हॅरिस चांगली फटेबाजी करत मैदानावर जम बसवू लागला होता. हॅरिसने अवघ्या 14 चेंडूत 21 धावा फटकावल्या होत्या. मात्र त्याचवेळी दिव्यांश सक्सेनाने कमाल केली आणि भारतीय चाहत्यांना सेलिब्रेशनची संधी दिली. दिव्यांशने एक अफलातून झेल घेत पाकला दणका दिला. त्यानंतर पाकिस्तानची पडझड सुरू झाली आणि संपूर्ण संघ 172 धावांमध्ये बाद झाला. पाकिस्तानने टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या संघाला 50 षटकेही खेळून काढता आली नाहीत. भारताच्या भेदक माऱ्यासमोर पाकचा संघ 43.1 षटकात 172 धावांपर्यंत मजल मारू शकला. रोहेल नझीर 62 धावा, हैदर अली 56 धावा आणि मोहम्मद हॅरीस 21 धावा वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. भारताच्या सुशांत मिश्राने 28 धावा देत सर्वाधिक तीन गडी बाद केले. त्यानंतर कार्तिक त्यागी आणि रवि बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन तर अंकोलेकर आणि जयस्वालने प्रत्येकी एक गडी बाद केला. दरम्यान, भारताने प्रियम गर्गच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला 74 धावांनी पराभूत करून अंडर 19 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली. तर पाकिस्तानने अफगाणिस्तानला पराभूत करून अंतिम चार जणांमध्ये स्थान पटकावलं आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Cricket, Ind vs pak

    पुढील बातम्या