मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

हार्दिकने हात जोडले रोहितने पंतलाही झापलं, ड्रेसिंग रूममधील VIDEO VIRAL

हार्दिकने हात जोडले रोहितने पंतलाही झापलं, ड्रेसिंग रूममधील VIDEO VIRAL

आशिया कपच्या सुपर-4 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाला5 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात कर्णधाराचा राग ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्यावर निघाल्याचं पाहायला मिळालं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : रोहित शर्मा मैदानात कूल असतो त्याला फार कमी वेळा तो चिडल्याचं समोर येत. रविवारी पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात रोहितचा संयम सुटल्याचं पाहायला मिळालं. रोहित शर्माचा रुद्रावतार क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळाला. ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आशिया कपच्या सुपर-4 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाला5 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात कर्णधाराचा राग ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्यावर निघाल्याचं पाहायला मिळालं. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

हार्दिक पांड्याने रोहितसमोर हात जोडल्याची चर्चा आहे. तर रोहित शर्माने ऋषभ पंतचाही क्लास घेतला. या दोघांना ओरडतानाचा ड्रेसिंग रूममधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पंत 14 धावा करून तंबुत परतला तर हार्दिक पांड्या शून्यवर आऊट झाला. हार्दिकने तर बॉलिंगमध्येही खूप धावा विरोधी टीमला दिल्या आहेत. अर्शदीपने सोपी कॅच सोडल्याने रोहितचा संयम सुटला. अत्यंत वाईट कामगिरी करत असल्याने त्याने पंत आणि हार्दिकची शाळा घेतली.

कोहलीनं सांगितलं पराभवाचं कारण

विराट कोहली म्हणाला की, ''आमचा स्कोअर 200 पार असता तर आपण कदाचित जिंकू शकलो असतो. खेळाची सुरुवात चांगली झाली. पण मिडल ऑर्डरने गडबड केली. त्यामुळे त्याचा फटका टीमला बसला. टीम इंडिया 20 ते 25 धावांसाठी मागे पडली असंही कोहली म्हणाला.''

First published:

Tags: Rohit sharma