मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /What A Catch! वॉशिंग्टन सुंदरच्या अफलातून कॅचचं होतंय कौतुक, VIDEO VIRAL

What A Catch! वॉशिंग्टन सुंदरच्या अफलातून कॅचचं होतंय कौतुक, VIDEO VIRAL

वॉशिंग्टन सुंदरने स्वत:च्याच गोलंदाजीवर टिपला अफलातून झेल

वॉशिंग्टन सुंदरने स्वत:च्याच गोलंदाजीवर टिपला अफलातून झेल

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

रांची, 28 जानेवारी : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात भारताला विजय मिळाला नसला तरी वॉशिंग्टन सुंदरच्या खेळाचं कौतुक होत आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही त्याने कमाल केली. न्यूझीलंडविरुद्धचा सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडचा सलामीवीर फिन एलनने केलेल्या फटकेबाजीमुळे 4 षटकातच त्यांच्या 37 धावा झाल्या होत्या. तर पाचव्या षटकात वॉशिंग्टनच्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूवर फिनने एक उत्तुंग षटकारही खेचला.

फिनने पुढच्या चेंडूवरही षटकार मारण्याचा प्रयत्न केला पण तो सूर्यकुमारच्या हाती झेल देऊन बाद झाला. फिनने 23 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह 35 धावा केल्या. त्याच्यानंतर मार्क चॅपमन मैदानात आला. पुढच्या सलग तीन चेंडूवर सुंदरने त्याला धाव काढू दिली नाही.

हेही वाचा : अर्शदीपची शेवटची ओव्हर अन् आघाडीच्या फलंदाजांची हाराकिरी, भारताच्या पराभवाला ठरले कारण

वॉशिंग्टनच्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर मार्क चॅपमॅनने तो लॉन्ग ऑफला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वॉशिंग्टन सुंदरपासून थोडा दूर असलेला चेंडू सुंदरने झेप घेत एका हाताने झेलला. यावेळी मैदानी पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. रिप्लेमध्ये सुंदरने हवेतच चेंडू पकडल्याचं स्पष्ट झालं आणि मार्क चॅपमन शून्यावर तंबूत परतला.

अक्षर पटेलच्या जागी संघात वर्णी लागलेल्या वॉशिंग्टन सुंदरने अष्टपैलू खेळी केली. त्याने गोलंदाजी करताना दोन विकेट घेतल्या. तर फलंदाजी करतानाही वेगवान अर्धशतक झळकावलं. व़ॉशिंग्टन सुंदरने २८ चेंडूत ५० धावा केल्या. अखेरच्या षटकात फटकेबाजीच्या नादात तो बाद झाला. पण सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने केलेल्या अष्टपैलू कामगिरीचं कौतुक नेटकरी करत आहेत.

First published:

Tags: Cricket, India