Home /News /sport /

विराटचा थ्रो पाहून जॉन्टी ऱ्होड्सला विसराल, VIDEO एकदा बघाच

विराटचा थ्रो पाहून जॉन्टी ऱ्होड्सला विसराल, VIDEO एकदा बघाच

भारताचा कर्णधार विराट कोहलीने न्यूझीलंडच्या हेन्री निकोलसला धावबाद करताना केलेला थ्रो पाहून जॉन्टी ऱ्होड्सलाही विसरून जाल.

    हॅमिल्टन, 05 फेब्रुवारी : न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली. त्यानतंर श्रेयस अय्यरचे शतक आणि केएल राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने धावांचा डोंगर उभा केला. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची अवस्था 2 बाद 109 अशी झाली होती. त्यानंतर रॉस टेलर आणि हेन्री निकोलस यांनी डाव सावरला होता. निकोलस शतकाकडे वाटचाल करत असताना भारताचा कर्णधार विराट कोहलीने केलेल्या अफलातून थ्रोवर तो धावबाद झाला. न्यूझीलंडच्या 32 षटकांत 3 बाद 189 धावा झाल्या होत्या. बुमराहने टाकलेल्या 29 व्या षटकात निकोलस धावबाद झाला. षटकातील तिसऱा चेंडू रॉस टेलरने टोलावला. त्यावर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात निकोलस धावला. त्यावेळी विराट कोहलीने चेंडू अडवल्यानंतर थेट स्टम्पकडे झेप घेत थ्रो केला आणि निकोलस बाद झाला. कोहलीने टी20 मधील अखेरच्या सामन्यातही केलेल्या थ्रोमुळे न्यूझीलंडचा फलंदाज बाद झाला होता. न्यूझीलंडने नाणेफेक प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना श्रेयस अय्यरचे शतक आणि विराट, केएल राहुल यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 50 षटकांत 4 बाद 347 धावा केल्या.भारताची सलामीची जोडी लवकर बाद झाली. तरी विराट कोहलीच्या अर्धशतकानंतर श्रेयस अय्यरने शतकी खेळी केली. त्याच्याशिवाय केएल राहुलनेही अर्धशतक केलं. टीम इंडियाच्या डावाची सुरुवात पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल यांनी केली. वनडेमध्ये पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या दोघांनीही सावध सुरुवात केली. मात्र पृथ्वी शॉ 20 धावांवर बाद झाला. पृथ्वी शॉ पाठोपाठ मयंक अग्रवालही 32 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने डाव सावरला. दोघांनी शतकी भागिदारी करत संघाचे दीड शतक पूर्ण केलं. विराट कोहलीने 61 चेंडूत अर्धशतक साजरं केलं. विराट 51 धावांवर बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि श्रेयस अय्यरने शतकी भागिदारी करत डाव सावरला. न्यूझीलंडच्या एका खेळाडूने केलेली चूक दुसऱ्याने सुधारली पण तोपर्यंत उशीर झाला जेम्स निशामने 17 व्या षटकात श्रेयस अय्यरला जीवगान दिलं. त्याचा लाभ अय्यरने उठवत शतक साजरं केल. श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि केदार जाधव यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा पुरेपूर समाचार घेतला. अय्यर बाद झाल्यानंतर राहुल आणि केदार जाधव यांनी 25 चेंडूतच 50 धावांची भागिदारी केली. केएल राहुल 88 धावांवर नाबाद राहिला तर केदार जाधव 26 धावांवर नाबाद राहिला. सहकाऱ्याला बाद करण्यासाठी धावणारे वर्ल्ड कप जिंकायला निघालेत, पाकचे खेळाडू ट्रोल
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या