Home /News /sport /

कर्णधार विराट कोहलीची 'दादा'गिरी, अर्धशतकासह नोंदवले हे विक्रम

कर्णधार विराट कोहलीची 'दादा'गिरी, अर्धशतकासह नोंदवले हे विक्रम

भारताचा कर्णधार विराट कोहलीने अर्धशतक करताना सौरव गांगुलीला मागे टाकलं. याशिवाय अय्यरसोबत विक्रमी भागिदारीही केली.

    हॅमिल्टन, 05 फेब्रुवारी : भारताचा कर्णधार विराट कोहली जेव्हा मैदानावर उतरतो तेव्हा तो काही ना काही विक्रम करतोच.न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक करताना त्याने आणखी एक विक्रम नोंदवला आहे. हे त्याचं एकदिवसीय क्रिकेटमधील 58 अर्धशतक आहे. रनमशिन अशी ओळख असलेला विराट कोहली वनडेमध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या फलंदाजांमध्ये सचिननंतर दुसऱ्या स्थानावर आहे. तर सर्वाधिक अर्धशतकांच्या बाबतीत तो 5 व्या स्थानावर आहे. विराटने आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 43 शतकं आणि 58 अर्धशतकं केली आहेत. भारताचा कर्णधार म्हणून खेळताना त्याने 83 डावात 5 हजार 123 धावा केल्या आहेत. याबाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. धोनीने 172 डावात 6 हजार 641 धावा केल्या होत्या. त्याखालोखाल मोहम्मद अझरुद्दीनचा नंबर लागतो. त्याने 162 डावात 5 हजार 239 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराटने 51 धावा केल्या. यासह त्याने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकलं. गांगुलीने कर्णधार म्हणून एकदिवसीय क्रिकेटमध्ये 5 हजार 82 धावा केल्या होत्या. 142 डावात त्याने ही कामगिरी केली होती. विराटने भारताचे नेतृत्व करताना एकदिवसीय सामन्यात 5 हजार 123 धावा केल्या आहेत. विराट याबाबतीत चौथ्या क्रमांकावर असला तरी त्याने फक्त 83 डावात ही कामगिरी केली आहे. भारताची सलामीची जोडी 54 धावांत तंबूत परतल्यानंतर विराट कोहलीने श्रेयस अय्यरसोबत डाव सावरला. दोघांनी शतकी भागिदारी करून संघाला दीडशेचा टप्पा पार करून दिला. टीम इंडियाची यंग ब्रिगेड फायनलमध्ये, 5 खेळाडूंनी मिळवून दिला विजय विराट आणि श्रेयसने 91 धावां भागिदारी पूर्ण करताच हॅमिल्टनवर विक्रम नोंदवला. या मैदानावर तिसऱ्या गड्यासाठी भारतीय फलंदाजांकडून सर्वात मोठी भागिदारी ठरली. याआधी 2014 मध्ये कोहली आणि रहाणे यांनी 90 धावांची भागिदारी केली होती. सेमीफायनलमध्ये यशस्वीचे शतक, मुंबईत वडिलांना दिलेलं वचन आफ्रिकेत केलं पूर्ण
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Cricket, Virat kohli

    पुढील बातम्या