मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ कॅप्टन रोहित शर्मा आणि जयपुरचे आहे खास जुने कनेक्‍शन; 'तो' जुना किस्सा व्हायरल

IND vs NZ कॅप्टन रोहित शर्मा आणि जयपुरचे आहे खास जुने कनेक्‍शन; 'तो' जुना किस्सा व्हायरल

Rohit Sharma

Rohit Sharma

रोहित शर्मा बुधवारी न्यूझीलंड विरुद्ध (IND vd NZ) 3 सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय T20 संघाचा कर्णधार म्हणून पदार्पण करेल.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर: रोहित शर्मा (Rohit Sharma) बुधवारी न्यूझीलंड विरुद्ध (IND vd NZ) 3 सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय T20 संघाचा कर्णधार म्हणून पदार्पण करेल. रोहितने अनेकवेळा भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे, परंतु तो प्रथमच पूर्णवेळ कर्णधार म्हणून भारतीय T20 संघाचे नेतृत्व करणार आहे. दरम्यान, जयपुरमध्ये होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्ध T20 मालिकेपूर्वी, रोहितचे जयपुरच्या स्टेडिअमशी (jaipur is very special in terms of captaincy for Rohit Sharma) असलेल्या खास जुन्या कनेक्‍शनचा किस्सा सध्या व्हायरल होत आहे.

रोहितचा हा नवा प्रवास बुधवारी जयपूर येथून सुरू होणार आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना होणार आहे. रोहित शर्मासाठी कर्णधारपदाच्या बाबतीत जयपूर खूप खास आहे. 9 वर्षांपूर्वी जयपूरमध्येच रोहित शर्माने पहिल्यांदाच मुंबईचा कर्णधार म्हणून भूमिका बजावली होती.

2021 मध्ये जेव्हा रोहितचे टीम इंडियातील स्थान निश्चित झाले नव्हते तेव्हा तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याची तयारी करत होता. त्याचवेळी रोहितने मुंबईची धूरा रोहितने सांभाळली होती. जयपूरच्या केएल सैनी मैदानावर त्याने पहिल्यांदाच मुंबईचे कर्णधारपद भूषवले होते.

9 वर्षांनंतर रोहित त्याच शहरातील सवाई मानसिंग मैदानावर पूर्णवेळ कर्णधार म्हणून भारतीय T20 संघाची कमान सांभाळणार आहे. यासोबतच रोहितचे ९ वर्षीय ट्विटही व्हायरल होत आहे. '2012 मध्ये जयपूरला पोहोचल्यानंतर त्याने एक ट्विट करून संघाचे नेतृत्व केल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता.'

रोहितसोबतच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आज नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. T20 विश्वचषक 2021 सह रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यानंतर द्रविडची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती.

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील तीन टी20 आणि 2 टेस्ट मॅचच्या मालिकेला आजपासून (बुधवार) जयपूरमध्ये सुरूवात होत आहे.

First published:

Tags: Rohit sharma, Team india, Test series