मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Ind Vs Nz, Test Series: कानपूर टेस्ट मॅचमध्ये काय असणार टीम इंडिया मेन्यू? Halal Meat चा समावेश

Ind Vs Nz, Test Series: कानपूर टेस्ट मॅचमध्ये काय असणार टीम इंडिया मेन्यू? Halal Meat चा समावेश

हॉटेल लँडमार्क टॉवरमध्ये (Hotel Landmark Tower) भारतीय खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने बायो-बबल तयार करण्यात आला आहे

हॉटेल लँडमार्क टॉवरमध्ये (Hotel Landmark Tower) भारतीय खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने बायो-बबल तयार करण्यात आला आहे

हॉटेल लँडमार्क टॉवरमध्ये (Hotel Landmark Tower) भारतीय खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने बायो-बबल तयार करण्यात आला आहे

  कानपूर, 20 नोव्हेंबर : नुकत्याच झालेल्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय टीमने चांगली कामगिरी केली नाही. पाकिस्तानकडून भारतीय टीमला पराभव स्वीकारावा लागला. नंतर भारतीय टीम (Indian Cricket Team) स्पर्धेतून बाहेरच पडली. त्यामुळे भारतीय क्रिकेटरसिक नाराज होते. त्यानंतर सुरू झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या तीन मॅचेसच्या टी-20 सीरिजमध्ये मात्र भारतीय टीमने आधीच्या खराब कामगिरीचा वचपा काढला आहे. तीनपैकी पहिल्या दोन्ही मॅचेस जिंकून भारतीय टीमने सीरिज खिशात घातली आहे. त्यानंतर येत्या 25 नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्धच टेस्ट सीरिज अर्थात कसोटी क्रिकेट मॅचेसची मालिका सुरू होत आहे. या सीरिजमध्ये दोन मॅचेस होणार असून, पहिली मॅच 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये (Kanpur Test Match) खेळली जाणार आहे.

  कानपूर टेस्ट मॅचमध्ये (India Vs New Zealand Cricket Test Match) अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) भारतीय टीमचं नेतृत्व करणार आहे. कॅप्टन विराट कोहलीला पहिल्या मॅचमध्ये आराम देण्यात आला असून, तो दुसऱ्या मॅचमध्ये टीमचं नेतृत्व करील. या टेस्ट सीरिजमध्ये रोहित शर्मा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंना खेळवण्यात येणार नाही.

  अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारासह 11 भारतीय खेळाडू कानपूरमधल्या हॉटेल लँडमार्क टॉवरमध्ये पोहोचले आहेत. आता या खेळाडूंना तीन दिवस विलगीकरणात राहावं लागेल. टेस्ट मॅचमध्ये सहभागी होणार असलेले बाकीचे खेळाडू सध्या सुरू असलेली टी-20 सीरिज संपली, की नंतर कानपुरात दाखल होतील.

  मराठमोळ्या तरुणाची कमाल! स्टार्टअपसाठी आनंद महिंद्रांनी दिली कोट्यवधींची ऑफर

  हॉटेल लँडमार्क टॉवरमध्ये (Hotel Landmark Tower) भारतीय खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने बायो-बबल तयार करण्यात आला आहे. तसंच, हॉटेल व्यवस्थापनाने भारतीय खेळाडूंसाठीच्या भोजनाचा मेनूही जाहीर केला आहे. 'आज तक'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

  दिवसातल्या पाच वेळांसाठी मेनू (Menu for Indian Cricket Team) हॉटेलने तयार केला आहे. त्यात ऑल डे काउंटर, स्टेडियममध्ये मिनी ब्रेकफास्ट, लंच, टी-टाइम स्नॅक आणि खेळानंतरचं डिनर यांचा समावेश आहे. या मेनूमध्ये पोर्क आणि बीफ यांचा समावेश नाही; मात्र मांसाहारी पदार्थांमध्ये हलाल मीटचा (Halal Meat) समावेश आहे.

  नाश्त्याचा मेनू : मुसली, पोहे, इडली, डोसा, सांबार, उपमा, पोंगल

  दुपारच्या जेवणातली सूप्स : भोपळ्याचं सूप, ब्रोकोली सूप, शतावरी सूप, मशरूम सूप, पालक सूप

  सॅलड्स : अंड्याचं सॅलड, ग्रीक सॅलड, गार्ड सॅलड, रशियन सॅलड

  मांसाहारी जेवण : चिकन थाई करी, गांव फिश करी, मुर्ग करी,

  शाकाहारी जेवण : पनीर टिक्का, आलू टिक्का, दिवानी हांडी, लहसुनी पालक, पनीर, कढाई व्हेज, मटार पनीर, दाल मखनी, मक्याची रोटी, बाजरीची रोटी, सरसों के साग, दही

  टी टाइम स्नॅक्स : चिकन काठी रोल, व्हेज काठी रोल, मल्टिग्रेन ब्रेड, सँडविच, ग्रिल्ड फिश

  रात्रीचं जेवण : व्हेजिटेबल बिर्याणी, मशरूम, लसूण चिकन, पनीर, बीन्स, मेक्सिकन भात

  कानपूरमध्ये पाच वर्षांहूनही अधिक काळानंतर टेस्ट मॅच होत आहे. ग्रीन पार्क स्टेडियममध्ये पाच वर्षांपूर्वी झालेली शेवटची टेस्ट मॅच भारत आणि न्यूझीलंड या टीम्समध्येच झाली होती.

  First published: