मुंबई, 22 नोव्हेंबर : न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये टीम इंडियाचा (India vs New Zealand T20 Series) 3-0 ने दणदणीत विजय झाला, यानंतर आता 25 नोव्हेंबरपासून दोन टेस्ट मॅचच्या सीरिजला (Test Series) सुरुवात होत आहे. घरच्या मैदानामध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड चांगला आहे, पण विराट कोहलीला (Virat Kohli) पहिल्या टेस्टसाठी तर रोहित शर्माला (Rohit Sharma) सीरिजसाठी विश्रांती गेण्यात आली आहे, त्यातच आता सूर्यकुमार यादवला टेस्ट टीममध्ये स्थान मिळाल्याचं वृत्त आहे. सुरुवातीला सूर्यकुमारची टेस्ट टीममध्ये निवड झाली नव्हती. पहिल्या टेस्टसाठी अजिंक्य रहाणे टीमचा कर्णधार असेल. ही सीरिज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा (WTC) भाग आहे.
सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) अखेरच्या दोन टी-20 सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करता आली नव्हती. मिड-डेमध्ये आलेल्या वृत्तानुसार सूर्यकुमार यादव कोलकात्यावरून टीमसोबत कानपूरला जाणार आहे. पहिली टेस्ट मॅच कानपूरमध्येच होणार आहे. 31 वर्षांच्या सूर्यकुमार यादवने पहिल्या टी-20मध्ये 62 रनची खेळी केली होती, पण पुढच्या दोन्ही सामन्यांमध्ये तो 1 आणि शून्य रनवर आऊट झाला.
मुंबईकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेल्या सूर्यकुमार यादवची प्रथम श्रेणी क्रिकेटमधली कामगिरी उत्कृष्ट आहे. 129 इनिंगमध्ये त्याने 38 च्या सरासरीने 5,326 रन केले आहेत, यात 14 शतकं आणि 26 अर्धशतकं आहेत, म्हणजेच त्याने 40 वेळा 50 पेक्षा जास्तचा स्कोअर केला आहे. 200 रन हा त्याचा सर्वोत्तम स्कोअर आहे. टीम इंडियाकडून सूर्यकुमार यादवने 3 वनडे आणि 11 टी-20 मॅच खेळल्या आहेत. आता न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्टमध्येही सूर्याला संधी मिळू शकते.
दुसरीकडे श्रेयस अय्यरलाही (Shreyas Iyer) टेस्ट टीममध्ये स्थान मिळालं आहे. विराट कोहली पहिली टेस्ट खेळणार नाही, त्यामुळे अय्यर चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. 26 वर्षांच्या श्रेयस अय्यरने 92 इनिंगमध्ये 52 च्या सरासरीने 4,592 रन केले आहेत, यात 12 शतकं आणि 23 अर्धशतकं आहेत. नाबाद 202 रन त्याचा सर्वोत्तम स्कोअर आहे.
पहिल्या टेस्टमध्ये केएल राहुल (KL Rahul) आणि मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) ओपनर म्हणून खेळू शकतात. तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि पाचव्या क्रमांकावर अजिंक्य रहाणेचं (Ajinkya Rahane) खेळणं निश्चित आहे. चौथ्या क्रमांकासाठी श्रेयस अय्यर, शुभमन गिल (Shubhaman Gill) आणि सूर्यकुमार यादव यांच्यात स्पर्धा असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Suryakumar yadav, Team india