• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs NZ : राहुलच्या दुखापतीमुळे दोन मुंबईकरांना लॉटरी, कानपूर टेस्टमधून करणार पदार्पण!

IND vs NZ : राहुलच्या दुखापतीमुळे दोन मुंबईकरांना लॉटरी, कानपूर टेस्टमधून करणार पदार्पण!

न्यूझीलंडविरुद्धच्या दोन टेस्ट मॅचच्या सीरिजआधी टीम इंडियाला (India vs New Zealand Test Series) मोठा धक्का लागला आहे. टीमचा ओपनर केएल राहुल (KL Rahul) मांडीच्या दुखापतीमुळे टेस्ट सीरिज खेळू शकणार नाही.

 • Share this:
  कानपूर, 23 नोव्हेंबर : न्यूझीलंडविरुद्धच्या दोन टेस्ट मॅचच्या सीरिजआधी टीम इंडियाला (India vs New Zealand Test Series) मोठा धक्का लागला आहे. टीमचा ओपनर केएल राहुल (KL Rahul) मांडीच्या दुखापतीमुळे टेस्ट सीरिज खेळू शकणार नाही. केएल राहुलच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचं संतुलनही बदललं आहे. केएल राहुल ओपनर असला तरी त्याच्या दुखापतीमुळे मधल्या फळीतली जागा खाली झाली आहे. ही जागा भरण्यासाठी दोन मुंबईकरांमध्ये स्पर्धा आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातली पहिली टेस्ट 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये सुरू होणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी रोहित शर्माला (Rohit Sharma) विश्रांती देण्यात आली आहे, तर विराट कोहलीही पहिली टेस्ट खेळणार नाही. आता राहुलला दुखापत झाल्यामुळे कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांच्यासाठी डोकेदुखी वाढू शकते. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) किंवा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांच्यापैकी एकाचं खेळणं जवळपास निश्चित झालं आहे. पहिल्या टेस्टमध्ये केएल राहुल आणि मयंक अग्रवाल ओपनिंगला खेळणार होते. तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजाराचं स्थान निश्चित होतं, तर चौथ्या क्रमांकावर शुभमन गिल खेळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. आता राहुलला दुखापत झाल्यामुळे गिलला ओपनिंग करावी लागेल, तर चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव किंवा श्रेयस अय्यर यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. पाचव्या क्रमांकावर अजिंक्य रहाणे आणि सहाव्या क्रमांकावर विकेट कीपर खेळेल. म्हणजेच पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडिया 5 बॅटर, 5 बॉलर आणि एक विकेट कीपरसह मैदानात उतरेल. केएल राहुलऐवजी सूर्यकुमार यादवची टीममध्ये निवड झाली आहे, पण पहिल्या टेस्टमध्ये श्रेयस अय्यरला संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. हे दोघं मधल्या फळीतील खेळाडू आहेत. दोघांनीही भारतासाठी वनडे आणि टी-20 मॅच खेळल्या आहेत, पण त्यांना टेस्ट खेळण्याची संधी मिळालेली नाही. कानपूरमध्ये अय्यर किंवा सूर्या आपल्या करियरमधली पहिली टेस्ट खेळतील. भारताची संभाव्य टीम मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, ऋद्धीमान साहा, रविंद्र जडेजा, आर.अश्विन, जयंत यादव/अक्षर पटेल/मोहम्मद सिराज, इशांत शर्मा, उमेश यादव
  Published by:Shreyas
  First published: