मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ : पहिल्या टेस्टमध्ये 'मुंबईकर' खेळाडूच ठरणार टीम इंडियासाठी धोकादायक!

IND vs NZ : पहिल्या टेस्टमध्ये 'मुंबईकर' खेळाडूच ठरणार टीम इंडियासाठी धोकादायक!

न्यूझीलंडला टी-20 सीरिजमध्ये 3-0 ने व्हाईट वॉश केल्यानंतर आता टीम इंडिया टेस्ट सीरिजसाठी (India vs New Zealand Test Series) सज्ज आहे. या दोन्ही टीममधली दोन टेस्ट मॅचची सीरिज 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये सुरू होत आहे.

  • Published by:  Shreyas

कानपूर, 23 नोव्हेंबर : न्यूझीलंडला टी-20 सीरिजमध्ये 3-0 ने व्हाईट वॉश केल्यानंतर आता टीम इंडिया टेस्ट सीरिजसाठी (India vs New Zealand Test Series) सज्ज आहे. या दोन्ही टीममधली दोन टेस्ट मॅचची सीरिज 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये सुरू होत आहे. रोहित शर्माला या सीरिजसाठी आराम देण्यात आला आहे, तर विराट कोहलीदेखील पहिली टेस्ट खेळणार नाही. केएल राहुलही दुखापतीमुळे सीरिजमधून बाहेर झाला आहे. अजिंक्य रहाणेकडे पहिल्या टेस्टसाठी टीम इंडियाचं नेतृत्व देण्यात आलं आहे. भारताचे प्रमुख खेळाडू टेस्ट सीरिजमध्ये खेळत नसल्यामुळे युवा खेळाडूंना संधी मिळत आहे, पण या खेळाडूंना न्यूझीलंडच्या उत्कृष्ट टीमचा सामना करावा लागणार आहे.

कानपूरच्या स्पिनरना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर भारताला धक्का देण्यासाठी 33 वर्षांचा एजाज पटेल (Ajaz Patel) सज्ज आहे. डावखुरा स्पिनर असलेला एजाज पटेल वयाच्या आठव्या वर्षी मुंबईहून न्यूझीलंडला गेला.

'याआधी कधीही न पाहिलेल्या भारतामध्ये मी आलो आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे आम्ही कुठेही बाहेर जाऊ शकत नाही, हे निराशाजनक आहे. भारतामध्ये स्पिन बॉलरना मदत होते, हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण भारताला त्यांच्या घरच्या मैदानात सामोरं जायचं आव्हानही तितकच कठीण आहे,' असं एजाज पटेल म्हणाला.

एजाज पटेलचा जन्म मुंबईमध्ये झाला, पण तो 8 वर्षांचा असताना कुटुंबासोबत न्यूझीलंडला गेला आणि तिकडेच स्थायिक झाला. सुरुवातीला तो डावखुरा फास्ट बॉलर होता, पण काही काळानंतर त्याने स्पिन बॉलिंग करायला सुरुवात केली. एजाजने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 200 पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. किवी टीमकडून तो टेस्ट आणि टी-20 आंतरराष्ट्रीय खेळला आहे.

जून महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टआधी मिचेल सॅन्टनरला दुखापत झाल्यानंतर एजाज पटेलला खेळवण्यात आलं. 16 महिन्यांनंतर त्याला टेस्ट खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने या संधीचं सोनं केलं. या सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये त्याने 14 ओव्हर टाकून 34 रन देत 2 विकेट घेतल्या, तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने 9 ओव्हरमध्ये 25 रन देऊन 2 विकेट आपल्या नावावर केल्या.

जून महिन्यानंतर एजाज पटेलने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बॉलिंग केलेली नाही. आतापर्यंत खेळलेल्या 9 टेस्टमध्ये त्याने 26 विकेट घेतल्या आहेत. यात दोन वेळा इनिंगमध्ये 5 विकेटचा समावेश आहे. तसंच दोन टी-20 सामन्यांमध्ये त्याला एक विकेट मिळाली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 67 मॅचमध्ये 248 विकेट पटकावल्या, यात 18 वेळा 5 विकेट आणि 3 वेळा 10 विकेट आहेत. याशिवाय त्याने एका अर्धशतकासह 14 च्या सरासरीने 972 रन केले.

First published:

Tags: New zealand, Team india