मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ : पुजारा का रहाणे? मुंबई टेस्टमधून एकाचा डच्चू निश्चित, विराट-द्रविड घेणार कठोर निर्णय!

IND vs NZ : पुजारा का रहाणे? मुंबई टेस्टमधून एकाचा डच्चू निश्चित, विराट-द्रविड घेणार कठोर निर्णय!

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडिया (India vs New Zealand 1st Test) मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे, पण मॅचच्या दोन्ही इनिंगमध्ये चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) पुन्हा अपयशी ठरले.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

कानपूर, 28 नोव्हेंबर : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडिया (India vs New Zealand 1st Test) मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे. पाचव्या म्हणजेच अखेरच्या दिवशी किवी टीमला विजयासाठी आणखी 280 रनची गरज आहे, त्यांच्या हातात 9 विकेट आहेत. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडचा स्कोअर 4/1 एवढा झाला होता. आर.अश्विनने ओपनर विल यंग याला एलबीडब्ल्यू केलं. त्याआधी श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) यांच्या अर्धशतकांमुळे टीम इंडिया संकटातून बाहेर आली. 234/7 वर भारताने इनिंग घोषित केली, त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी 284 रनचं आव्हान मिळालं.

श्रेयस अय्यर 65 रन करून, तर अश्विन 32 रनवर आऊट झाला. ऋद्धीमान साहा 61 रनवर आणि अक्षर पटेल (Axar Patel) 28 रनवर नाबाद राहिले. चौथ्या दिवसाची सुरुवात 14/1 अशी करणाऱ्या टीम इंडियाची अवस्था खराब झाली होती. 51 रनवरच टीमच्या 5 विकेट गेल्या होत्या. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 22 रन करून तर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 4 रनवर आऊट झाले.

पुजारा आणि रहाणे पहिल्या इनिंगमध्येही अपयशी ठरले होते. पुजाराने पहिल्या इनिंगमध्ये 26 तर रहाणेने 35 रनची खेळी केली होती. 2017 पासून रहाणे घरच्या मैदानात 28 पैकी 20 वेळा स्पिन बॉलरसमोर आऊट झाला आहे. स्पिनर्ससमोर रहाणेचे पाय हलत नसल्यामुळे त्याला अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा म्हणाला.

रहाणे-पुजारापेक्षा अश्विनच्या रन जास्त

पहिल्या टेस्टमध्ये आर.अश्विनने फक्त बॉलिंगच नाही तर बॅटिंगनेही प्रभावित केलं. पहिल्या इनिंगमध्ये 38 रन करणाऱ्या अश्विनने दुसऱ्या इनिंगमध्ये 32 रन केले, म्हणजेच अश्विनने या सामन्यात पुजारा आणि रहाणेपेक्षा जास्त रन केल्या आहेत. पहिल्या इनिंगमध्ये शतक करणाऱ्या श्रेयस अय्यरने दुसऱ्या इनिंगमध्ये अर्धशतक केलं, तर शुभमन गिल आणि रवींद्र जडेजा यांनी पहिल्या इनिंगमध्ये अर्धशतकी खेळी केली, ज्यामुळे या तिघांचं टीममधलं स्थान निश्चित आहे.

मुंबईमध्ये 3 डिसेंबरपासून दुसऱ्या टेस्टला सुरुवात होत आहे. या सामन्यात विराट कोहलीचं टीम इंडियात पुनरागमन होणार आहे, त्यामुळे अजिंक्य रहाणे किंवा चेतेश्वर पुजारा यांच्यापैकी एकाला टीममधून बाहेर बसावं लागणार, हे जवळपास निश्चित आहे. हा निर्णय घेणं कर्णधार विराट कोहली आणि कोच राहुल द्रविड यांच्यासाठी मात्र कठीण असणार आहे.

First published:

Tags: Ajinkya rahane, Pujara