Home /News /sport /

खेळाडू नाही तर Spider Cam ला कोहलीने दिला दम, जागा सोडण्याचे दिले आदेश; हा VIDEO एकदा पाहाच

खेळाडू नाही तर Spider Cam ला कोहलीने दिला दम, जागा सोडण्याचे दिले आदेश; हा VIDEO एकदा पाहाच

India Vs New Zealand Test: टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवशी ग्राऊंडमध्ये आलेल्या स्पायडर कॅमला सज्जड दम दिला आहे. कालपासून (5 डिसेंबर 2021) सोशल मीडियावर या घटनेचे मजेशीर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

मुंबई, 06 डिसेंबर: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium India Vs New Zealand Test) झालेल्या टेस्टमॅचमध्ये (India Vs New Zealand Test Match) भारतानं न्यूझीलंडचा 372 रन्सनी पराभव केला. या विजयाबरोबरच भारतानं ही 1-0 अशा फरकानं टेस्ट सिरीजही जिंकली आहे. टीम इंडियानं न्यूझीलंडला मॅच जिंकण्यासाठी 540 रन्सचं टार्गेट दिलं होतं. मात्र, पाहुण्या न्यूझीलंडची टीम दुसऱ्या इनिंगमध्ये अवघ्या 167 रन्सवर ऑलआऊट झाली. रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि जयंत यादव, मयंक अग्रवाल हे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. मात्र, या खेळाडूंपेक्षा सध्या आपला टेस्ट कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli Latest Video) जास्त चर्चेत आहे. त्यानं टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवशी ग्राऊंडमध्ये आलेल्या स्पायडर कॅमला (Kohli Instructs Malfunctioned Spider Cam to Behave) सज्जड दम दिला आहे. कालपासून (5 डिसेंबर 2021) सोशल मीडियावर या घटनेचे मजेशीर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. हे वाचा-टीम इंडियानं घेतला न्यूझीलंडचा बदला, ICC टेस्ट रँकिंगमध्ये मारली मोठी उडी विजयासाठी 540 रन्सच टारगेट घेऊन ग्राऊंडवर उतरेली न्यूझीलंडची टीम आपल्या दुसऱ्या इनिंगमध्ये व्यस्त होती. चौथ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर रविचंद्रन अश्विननं न्यूझीलंडचा कॅप्टन टॉम लॅथमला (Tom Latham) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तो आऊट होऊन पॅव्हेलियनकडे जात असताना पुढचा बॅटर ग्राऊंडवर दाखल झाला. नेमक्या त्याचवेळी स्पायडर कॅम नॉन-स्ट्रायकिंग एन्डवर आला. नेहमीप्रमाणं ग्राऊंडवर आलेल्या नवीन बॅटरचा व्हिडिओ घेण्यासाठी स्पायडर कॅम त्या ठिकाणी थांबला आहे, असा प्रत्येकाचा समज झाला. मात्र, खूप वेळ होऊनही स्पायडर कॅम एकाच जागेवर थांबल्यानं अंपायर आणि प्लेयर्स गोंधळात पडले. दरम्यान मजामस्ती करण्यात नेहमी पुढे असलेल्या इंडियन टीमनं (Indian Team) स्पायडर कॅमसोबत खेळण्यास सुरुवात केली. मोहम्मह सिराज, भारत, श्रेयस अय्यरनं सर्वात अगोदर स्पायडर कॅमला हात लावला. त्यापाठोपाठ रविचंद्रन अश्विननंही या कॅमसमोर गंमत केली. टीममधील सहकारी मस्ती करत असताना कॅप्टन विराट कोहली तरी कसा मागे राहिल. तो देखील स्पायडर कॅमजवळ आला. कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये पाहून त्यानं कॅमला तत्काळ आपली जागा सोडण्यास सांगितलं. या सर्व मजेशीर प्रकरणाचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. बीसीसीआयनं (BCCI) देखील आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून याबाबत मजेशीर पोस्टही शेअर केली आहे. बराच वेळ कॅमेरा जागेवरून हलला नाही. त्यामुळं दोन्ही अंपायर्सनी वेळे अगोदरच टी ब्रेक (Tea Break) घेण्याचा निर्णय घेतला. हा कॅम टेक्निकल एररमुळे अडकल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या वेळेत स्पायडर कॅममधील टेक्निकल एरर दुरुस्त करण्यात आली. हा प्रकार घडला त्यावेळी न्यूझीलंडचा स्कोअर 1 आऊट 13 रन्स इतका होता.
First published:

Tags: Sports

पुढील बातम्या