मुंबई, 9 नोव्हेंबर : टीम इंडियाच्या (Team India) टी-20 फॉरमॅटमध्ये रोहित (Rohit Sharma Captain) पर्व सुरू झालं आहे. विराट कोहलीनंतर (Virat Kohli) रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार असेल, असं बीसीसीआयने अधिकृतरित्या जाहीर केलं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी-20 मॅचच्या सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये निराशाजनक कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंचा या सीरिजमधून पत्ता कट करण्यात आला आहे. हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्ती आणि मोहम्मद शमी यांना टीममधून डच्चू देण्यात आला आहे, तर विराट कोहली, रवींद्र आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. राहुल चहर आणि शार्दुल ठाकूरचीही टीममधून गच्छंती झाली आहे.
आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाड, आवेश खान आणि व्यंकटेश अय्यर यांची टीम इंडियात निवड झाली आहे. युझवेंद्र चहलचंही टीममध्ये पुनरागमन झालं आहे. केएल राहुल टीमचा उपकर्णधार आहे.
NEWS - India’s squad for T20Is against New Zealand & India ‘A’ squad for South Africa tour announced.@ImRo45 named the T20I Captain for India.
More details here - https://t.co/lt1airxgZS #TeamIndia pic.twitter.com/nqJFWhkuSB — BCCI (@BCCI) November 9, 2021
भारतीय टीम
रोहित शर्मा, केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, ईशान किशन, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर.अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज
17 नोव्हेंबरपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तीन टी-20 मॅचच्या सीरिजला सुरुवात होत आहे. 19 नोव्हेंबरला दुसरी आणि 21 नोव्हेंबरला तिसरी टी-20 खेळवली जाईल. जयपूर, रांची आणि कोलकात्यामध्ये तीन टी-20 मॅच खेळवल्या जाणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rohit sharma, Team india