• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs NZ : T20 सीरिजवर टीम इंडियाचा कब्जा, रोहित-द्रविडची धडाकेबाज सुरुवात, पण एक कोडं कायम!

IND vs NZ : T20 सीरिजवर टीम इंडियाचा कब्जा, रोहित-द्रविडची धडाकेबाज सुरुवात, पण एक कोडं कायम!

रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) या जोडीने धडाकेबाज सुरुवात केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा (India vs New Zealand T20 Series) 7 विकेटने विजय झाला आहे.

 • Share this:
  रांची, 19 नोव्हेंबर : रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) या जोडीने धडाकेबाज सुरुवात केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा (India vs New Zealand T20 Series) 7 विकेटने विजय झाला आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक झाली होती. सुपर-12 स्टेजलाच टीमचं आव्हान संपुष्टात आलं होतं. विराट कोहलीनेही (Virat Kohli) टीमची कॅप्टन्सी सोडल्यानंतर रोहित शर्माकडे ही जबाबदारी आली, तसंच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राहुल द्रविडला मुख्य प्रशिक्षक करण्यात आलं. रोहित आणि द्रविडच्या जोडीने सुरुवात चांगली केली आहे. मूळ प्रश्न कायम न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला असला तरी मूळ प्रश्न मात्र अजूनही कायम आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाने फक्त पाच बॉलरचाच वापर केला. टी-20 वर्ल्ड कपमध्येही (T20 World Cup) याच गोष्टीने भारताचा घात केला होता. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) फिटनेसमुळे त्याने बॉलिंग केली नव्हती, ज्याचा फटका भारताला बसला. यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजसाठी व्यंकटेश अय्यरची (Venkatesh Iyer) टीममध्ये निवड झाली. आयपीएलमध्ये व्यंकटेश अय्यर मध्यम गती बॉलिंगही करतो, पण रोहितने त्याला एकदाही बॉलिंगची संधी दिली नाही. ऑस्ट्रेलियात होणारा पुढचा टी-20 वर्ल्ड कप आता अवघ्या 11 महिन्यांवर येऊन ठेपला आहे, त्याआधी रोहित आणि द्रविडच्या जोडीला ऑलराऊंडरचा प्रश्न मार्गी लावावा लागणार आहे. राहुल-रोहित जोडीचं आक्रमण दुसऱ्या टी-20 मध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियाने 7 विकेटने विजय मिळवला. न्यूझीलंडने दिलेल्या 154 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना राहुल आणि रोहित यांच्यात 13.2 ओव्हरमध्ये 117 रनची पार्टनरशीप केली. केएल राहुलने 49 बॉलमध्ये 65 आणि रोहितने 36 बॉलमध्ये 55 रन केले. ऋषभ पंतने लागोपाठ दोन सिक्स मारून भारताचा विजय निश्चित केला. न्यूझीलंडकडून फक्त टीम साऊदीच यशस्वी ठरला, त्याला तीन विकेट घेण्यात यश आलं. त्याआधी भारतीय बॉलर्सनी (India vs New Zealand 2nd T20) टिच्चून बॉलिंग केली, त्यामुळे सीरिज जिंकण्यासाठी भारताला 154 रनचं आव्हान मिळालं. रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर मार्टिन गप्टील (Martin Guptill) आणि डॅरेल मिचेल (Darell Mitchell) यांनी न्यूझीलंडला धमाकेदार सुरुवात करून दिली. या दोन्ही ओपनरमध्ये 4.2 ओव्हरमध्ये 48 रनची पार्टनरशीप केली, यानंतर मात्र न्यूझीलंडच्या दुसऱ्या कोणत्याच खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. मार्टिन गप्टील आणि मिचेलनी प्रत्येकी 31-31 रनची खेळी केली, तर ग्लेन फिलिप्स 34 रन करून आऊट झाला. आपली पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅच खेळणाऱ्या हर्षल पटेलने 4 ओव्हरमध्ये 25 रन देऊन 2 विकेट घेतल्या. भुवनेश्वर, दीपक चहर, अश्विन आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
  Published by:Shreyas
  First published: