मुंबई, 30 जानेवारी : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात काल लखनौ येथे टी 20 मालिकेतील दुसरा सामना पारपडला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर निसटता विजय मिळवून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. भारताच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडला 99 धावांवर रोखले. परंतु 100 धावांचा टप्पा पार करत असताना भारतीय खेळाडूंची दमछाक झाली. तेव्हा भारताचा डाव सावरण्यासाठी नेहमी चौकार शटकारांची आतिषबाजी करणाऱ्या सूर्यकुमार यादवने संथ खेळी करून भारताला विजय मिळवून दिला.
लखनौच्या मैदानावर टी 20 मालिकेतील दुसरा सामना खेळण्यासाठी सर्वप्रथम न्यूझीलंडचा संघ मैदानात उतरला. यावेळी भारतीय संघाच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत न्यूझीलंड संघाला ९९ धावांवर रोखले. भारतीय संघाला विजयासाठी 20 षटकात केवळ 100 धावा करण्याचे आव्हान होते.
हे ही वाचा : ऐतिहासिक विजयानंतर भारताच्या पुरुष संघाने महिला क्रिकेटर्सचे केले अभिनंदन
परंतु या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना देखील भारतीय संघाची दमछाक झाली. सुरुवातीचे सलामी फलंदाज स्वस्तात बाद झाले. त्यानंतर मैदानात आलेल्या सूर्यकुमार यादवने संघासाठी महत्वाची भूमिका बजावली. त्याने त्याच्या नेहमीच्या खेळाला बाजूला ठेवत अतिशय संथ खेळी केली. त्याने स्ट्राईक रोटेट करत हळूहळू भारताचे लक्ष्य पूर्ण केले.
हे ही वाचा : टीम इंडियाच्या महिला क्रिकेटपटूंचा बॉलीवूड गाण्यावर विक्ट्री डान्स, Video Viral
टी-20 क्रिकेटचा नंबर वन फलंदाज सूर्यकुमार यादवने लखनौमधील सामन्यात 31 चेंडूत फक्त 26 धावा केल्या, ज्यात त्याने फक्त एक चौकार ठोकला. ही सूर्यकुमारच्या कारकिर्दीतील ही त्याची सर्वात संथ खेळी ठरली. या खेळीसाठी सूर्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. कर्णधार हार्दिक पांड्याने 20 चेंडूत 15 धावा केल्या. भारताने टी 20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडवर 6 विकेट्सने विजय मिळवला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, Hardik pandya, Suryakumar yadav, Team india