Home /News /sport /

सुपर ओव्हरमधल्या धावांचं होतं काय? फलंदाजाच्या खात्यात जातात की...

सुपर ओव्हरमधल्या धावांचं होतं काय? फलंदाजाच्या खात्यात जातात की...

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची टी20 मालिका सुपर ओव्हरमुळे चांगलीच गाजली.

    मुंबई, 02 फेब्रुवारी : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची टी20 मालिका सुपर ओव्हरमुळे चांगलीच गाजली. तिसऱ्या आणि चौथ्या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागल्यानंतर सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत आहेत. गेल्या वर्षभरात न्यूझीलंडला तीनवेळा सुपर ओव्हरचा सामना करावा लागला आहे. वर्ल्ड कपच्या फायनलमध्येही त्यांना सुपर ओव्हर खेळायला लागली होती. त्यातही त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे आता न्यूझीलंडने सुपर ओव्हर विरोधात बंद पुकारला आहे असंही विनोदाने म्हटलं जात आहे. न्यूझीलंडलविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा हिटमॅन रोहित शर्माने अखेरच्या दोन चेंडूवर षटकार मारून विजय मिळवून दिला. तर चौथ्या सामन्यात केएल राहुल आणि विराट कोहली यांनी सुपर ओव्हरमध्ये भारताला विजय मिळवून दिला. न्यूझीलंडला आतापर्यंत 7 वेळा सुपर ओव्हरमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. यात सहावेळा आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात पराभव झाला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर वेगळीच चर्चा आहे. ती म्हणजे सुपर ओव्हरमध्ये काढलेल्या धावा फलंदाजाच्या खात्यात जमा होतात की नाही याची. याबाबत आयसीसीचा एक नियम आहे. खरंतर हा नियम मेरिलीबोन क्रिकेट क्लबने तयार केला आहे. आयसीसी या नियमांची अंमलबजावणी करते. सुपर ओव्हरबद्दलही मेरिलीबोन क्रिकेट क्लबने नियम तयार केला आहे. तो आंतरराष्ट्रीय पातळीवर लागू करण्यात आला आहे. 21 व्या वर्षी जिंकली ऑस्ट्रेलियन ओपन, दिग्गजांना मागे टाकून रचला इतिहास सुपर ओव्हरमध्ये प्रत्येक संघाला एक षटक टाकण्याची संधी दिली जाते. यात प्रत्येक संघाचे तीन फलंदाज मैदानात उतरू शकतात. सामन्याचा निकाला लागावा यासाठी सुपर ओव्हर खेळवली जाते. त्यामुळे या षटकात काढलेल्या धावा फलंदाजाच्या खात्यात मोजल्या जात नाहीत. BCCI मध्ये महाराष्ट्राची कन्या, निर्णय प्रक्रियेत बजावणार महत्त्वाची भूमिका
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या