मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ : टीम इंडियात निवड नाही, 3 PHOTO शेयर करत संजू सॅमसनचा निवड समितीवर निशाणा

IND vs NZ : टीम इंडियात निवड नाही, 3 PHOTO शेयर करत संजू सॅमसनचा निवड समितीवर निशाणा

न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी-20 मॅचच्या सीरिजसाठी (India vs New Zealand T20 Series) ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि ईशान किशन (Ishan Kishan) या दोन विकेट कीपरना टीम इंडियात स्थान देण्यात आलं, त्यामुळे संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी मिळाली नाही.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 10 नोव्हेंबर : न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी-20 मॅचच्या सीरिजसाठी (India vs New Zealand T20 Series) ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि ईशान किशन (Ishan Kishan) या दोन विकेट कीपरना टीम इंडियात स्थान देण्यात आलं. संजू सॅमसनला (Sanju Samson) पुन्हा एकदा वगळण्यात आल्यानंतर त्याने निवड समितीवर अप्रत्यक्ष निशाणा साधल्याचं बोललं जात आहे. संजू सॅमसनने सोशल मीडियावर तीन फोटो शेयर केले, या फोटोला कोणतंही कॅप्शन देण्यात आलं नाही, पण टीम इंडियात निवड न झाल्यामुळे संजू सॅमसन नाराज झाल्याची चर्चा आहे. संजू सॅमसनने शेयर केलेले हे फोटो त्याच्या उत्कृष्ट फिल्डिंगचे आहेत.

आयपीएल 2021 च्या युएईमध्ये झालेल्या दुसऱ्या राऊंडमध्ये संजू सॅमसन फॉर्ममध्ये होता. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना संजू सॅमसनने सातत्यपूर्ण कामगिरी केली. मागच्या काही वर्षांमध्ये संजू सॅमसनच्या कामगिरीमध्ये सातत्य नसल्याचं दिसत होतं, या आयपीएलमध्ये मात्र त्याने स्वत:ची चूक सुधारली.

सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्येही संजू सॅमसनने आपला फॉर्म कायम ठेवला आहे. 26 वर्षांच्या या खेळाडूने केरळकडून खेळताना 5 इनिंगमध्ये 87.50 च्या सरासरीने 175 रन केले, यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. सोमवारी होणाऱ्या हिमाचल प्रदेशविरुद्धच्या प्री क्वार्टर फायनलमध्ये संजू सॅमसन केरळचं नेतृत्व करेल.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी भारतीय टीम

रोहित शर्मा, केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, ईशान किशन, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर.अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज

First published:

Tags: Team india