Home /News /sport /

रॉस टेलरचा 'ठीक है' VIDEO तुफान व्हायरल, तुम्ही पाहिलात का?

रॉस टेलरचा 'ठीक है' VIDEO तुफान व्हायरल, तुम्ही पाहिलात का?

न्यूझीलंडला जरी भारताविरुद्ध 5 टी-20 सामन्यांची मालिका जिंकता आली नसली तरी त्यांच्या खेळाडूंनी भारतीयांचे मन जिंकले.

    मुंबई, 03 फेब्रुवारी : न्यूझीलंडला जरी भारताविरुद्ध 5 टी-20 सामन्यांची मालिका जिंकता आली नसली तरी त्यांच्या खेळाडूंनी भारतीयांचे मन जिंकले. सध्या सोशल मीडियावर न्यूझीलंडच्या खेळाडूंचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. न्यूझीलंडच्या खेळाडूंच्या खिलाडूवृत्तीचे कौतुक सध्या सर्वच चाहते करत आहेत. यात रॉस टेलरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रॉस टेलर चक्क हिंदी बोलताना दिसत आहे. याआधी मार्टिन गुप्टिलच्या हिंदीची चर्चा झाली होती. मार्टिन गुप्टिलने एका टी-20 सामन्यानंतर युझवेंद्र चहलसोबत सहज बोलता बोलता शिवी दिली होती. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. त्यानंतर आता रॉस टेलरचा पत्रकार परिषदेतील व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात रॉस टेलर हिंदी बोलताना दिसत आहे. रॉस टेलर पत्रकार परिषदेत येतो तेव्हा कॅमेरामन त्याला टोपी नीट करण्यासाठी सांगतो. टोपी नीट केल्यानंतर रॉस टेलर हिंदीत ठीक है? असं विचारतो. यावर एक रिपोर्टर रॉस टेलरला म्हणतो की पहिला प्रश्न हिंदीत विचारू का? यावरही टेलर म्हणतो की ठीक आहे तरीही मी हिंदीत उत्तर देईन. न्यूझीलंडच्या पराभवानंतर रॉस टेलर म्हणाला की, भारताविरुद्धचा पराभव खूपच निराशाजनक आहे. मात्र त्यांच्या संघाने इतकाही वाईट खेळ केलेला नाही. त्यांना आधीपासूनच माहिती होतं की, त्यांचा सामना बलाढ्य संघाशी आहे.  आम्ही खराब कामगिरी करूनही चांगला खेळ केला असंही रॉस टेलर म्हणाला. न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात भारताने 7 धावांनी विजय मिळवला. भारताने दिलेल्या 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची अवस्था एकवेळ 3 बाद 17 अशी झाली होती. त्यानंतर रॉस टेलर आणि टिम सेफर्टने सावध खेळ करत डाव सावरला. 9 षटकांत न्यूझीलंडच्या 64 धावा झाल्या होत्या. त्यानतंर दहाव्या षटकात सेफर्ट आणि टेलरने शिवम दुबेच्या एका षटकात 34 धावा वसूल केल्या. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी सामन्यावर पकड मिळवली. टिम सेफर्टला नवदीप सैनीने बाद केल्यानंतर न्यूझीलंडचे खेळाडू एका पाठोपाठ एक बाद होत गेले. सैनी, वॉशिंग्टन सुंदर आणि बुमराह यांच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझीलंडचे तळाचे फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत आणि त्यांचा डाव 156 धावांत संपुष्टात आला. बेx xx! विराट नेहमी काय बोलतो? बेन स्टोक्सचं हे भन्नाट उत्तर पाहाच
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Cricket, Ross taylor

    पुढील बातम्या