मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ : टीम इंडिया T20 ची चांगली टीम, जिंकण्यासाठी करावं लागणार हे काम, रोहितने सांगितला फॉर्म्युला

IND vs NZ : टीम इंडिया T20 ची चांगली टीम, जिंकण्यासाठी करावं लागणार हे काम, रोहितने सांगितला फॉर्म्युला

rohit sharma

rohit sharma

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातल्या टी-20 सीरिजला (T20 Series) बुधवार 17 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या सीरिजपासून भारतीय क्रिकेटमध्ये नव्या पर्वाला सुरुवात होत आहे. रोहित शर्माची (Rohit Sharma) टी-20 टीमचा कर्णधार म्हणून नियुक्ती झाली आहे, तर राहुल द्रविड (Rahul Dravid) टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

जयपूर, 16 नोव्हेंबर : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातल्या टी-20 सीरिजला (T20 Series) बुधवार 17 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या सीरिजपासून भारतीय क्रिकेटमध्ये नव्या पर्वाला सुरुवात होत आहे. रोहित शर्माची (Rohit Sharma) टी-20 टीमचा कर्णधार म्हणून नियुक्ती झाली आहे, तर राहुल द्रविड (Rahul Dravid) टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाला आहे. नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक झाली. भारतीय टीमला या टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनललाही पोहोचता आलं नाही. आता पुढचा टी-20 वर्ल्ड कप 11 महिन्यांवर येऊन ठेपला आहे, त्यामुळे रोहित शर्मा आणि राहुल द्रविडच्या जोडीला नवी टीम तयार करावी लागणार आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्याआधी रोहित शर्माने विजयाचा फॉर्म्युला सांगितला. 'भारताची टी-20 आंतरराष्ट्रीयमधली कामगिरी चांगली राहिली आहे, पण आम्हाला आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही. यासाठी आम्हाला ब्लू प्रिंट तयार करावी लागेल', असं विधान रोहितने केलं. 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही. 'विराट कोहली महत्त्वाचा खेळाडू आहे. तो जेव्हा खेळतो तेव्हा त्याचा खूप प्रभाव असतो. त्याच्या पुनरागमनानंतर टीम आणखी मजबूत होईल,' असं रोहित म्हणाला. विराट कोहलीला टी-20 सीरिज आणि पहिल्या टेस्टसाठी आराम देण्यात आला आहे. दुसऱ्या टेस्टपासून तो टीममध्ये पुनरागमन करेल.

टी-20 सीरिजमधून अनेक मोठे खेळाडू बाहेर आहेत, यावरही रोहितने प्रतिक्रिया दिली. आम्ही मशीन नाही, वर्कलोड मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे, याच कारणामुळे वरिष्ठ खेळाडूंना आराम दिला गेलाय. आम्हाला ताजेतवाने राहायचंय, तसंच पुढच्या सीरिजसाठीही तयारी करायची आहे, असं रोहितने सांगितलं. टी-20 वर्ल्ड कपदरम्यान अनेक वरिष्ठ खेळाडू 6 महिन्यांपासून बायो-बबलमध्ये होते. पराभवानंतर यावरही प्रश्न उपस्थित झाले होते. कोच रवी शास्त्री यांनीही यावरून बीसीसीआयवर खापर फोडलं होतं.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन भारताविरुद्धची टी-20 सीरिज खेळणार नाही, त्याच्याऐवजी टीम साऊदीकडे किवी टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे. विलियमसनची कमी न्यूझीलंडला जाणवेल, पण त्यांच्याकडे अनेक मॅच जिंकवून देणारे खेळाडू आहेत. टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्यांच्या अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, आमचं लक्ष सगळ्यांवर आहे, असं वक्तव्य रोहित शर्माने केलं.

First published:

Tags: Rohit sharma, T20 cricket