मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs NZ : कॅप्टन होताच रोहित टीम मीटिंगमध्ये काय म्हणाला? वाचा Inside Story

IND vs NZ : कॅप्टन होताच रोहित टीम मीटिंगमध्ये काय म्हणाला? वाचा Inside Story

विराट कोहलीनंतर (Virat Kohli) भारताच्या टी-20 टीमचं नेतृत्व रोहित शर्माकडे (Rohit Sharma) आलं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये (India vs New Zealand T20 Series) रोहित पहिल्यांदाच टीम इंडियाचा पूर्णवेळ कॅप्टन झाला.

पुढे वाचा ...

कोलकाता, 22 नोव्हेंबर : विराट कोहलीनंतर (Virat Kohli) भारताच्या टी-20 टीमचं नेतृत्व रोहित शर्माकडे (Rohit Sharma) आलं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये (India vs New Zealand T20 Series) रोहित पहिल्यांदाच टीम इंडियाचा पूर्णवेळ कॅप्टन झाला. टीमचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर झालेल्या पहिल्या टीम मीटिंगमध्ये आपण काय म्हणालो, याचा खुलासा रोहितने केला आहे. मी आणि राहुल द्रविड यांनी खेळाडूंना विश्वास दिला. टीम मॅनजमेंट कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांच्यासोबत उभी असेल, असं रोहितने सांगितलं.

'पहिल्याच टीम मीटिंगमध्ये आम्ही स्पष्ट केलं, की जर तुम्ही टीमसाठी काही करण्याचा प्रयत्न करत असाल, तर त्याकडे कोणीच लक्ष देणार नाही, असं होणार नाही. तुम्ही टीमसाठी दबाव झेलला आहे आणि चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे, याची कायमच कदर केली जाईल. तुम्ही प्रयत्न केल्यानंतर निकाल योग्य लागला तर चांगलीच गोष्ट आहे, पण जर तसं झालं नाही तर आम्ही तुमच्यासोबत उभे राहू, कारण तुम्ही टीमच्या चांगल्यासाठी प्रयत्न केले आहेत. टीमसाठी कोणीही काही करत असेल, तर तो चांगला संकेत आहे,' असं रोहित म्हणाला.

'स्थानिक क्रिकेटमध्ये टॅलेंट आणि बेंच स्ट्रेन्थ खूप आहे, त्यामुळे यातून खेळाडूंची निवड करणं कठीण आहे. तुमच्याकडे खूप पर्याय असतात, तसंच जे टीमबाहेर आहेत त्यांनीही सातत्याने चांगली कामगिरी केलेली असते. आम्ही सगळ्यांना टीममध्ये फिट करण्याचा प्रयत्न करतो, पण फक्त 11 खेळाडूच मैदानात उतरू शकतात. हे कायमच कठीण काम असतं, पण खेळाडू जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा त्याच्या मनावर कोणताही दबाव नसावा, हे निश्चित करण्याचा प्रयत्न आम्ही करू,' अशी प्रतिक्रिया रोहित शर्माने दिली.

यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक झाली. सुपर-12 स्टेजलाच टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात आलं. वर्ल्ड कप सुरू व्हायच्या आधीच विराटने आपण टी-20 फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडणार असल्याचं जाहीर केलं होतं, तसंच मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळही वर्ल्ड कपनंतर संपला. यानंतर रोहित शर्माला टी-20 टीमचं कॅप्टन तर राहुल द्रविडला (Rahul Dravid) मुख्य प्रशिक्षक करण्यात आलं. आपल्या पहिल्याच सीरिजमध्ये रोहित आणि द्रविडच्या जोडीने न्यूझीलंडचा 3-0 ने व्हाईट वॉश केला. पुढचा टी-20 वर्ल्ड कप 11 महिन्यांनी ऑस्ट्रेलियात होणार आहे, त्याआधी टीमची पुन्हा नव्याने बांधणी करण्याचं आव्हान रोहित आणि द्रविडच्या जोडीपुढे असणार आहे.

First published:
top videos

    Tags: New zealand, Rohit sharma, Team india