Home /News /sport /

विराट कोहलीच्या एका निर्णयाने ऋषभ पंतचे करिअर धोक्यात

विराट कोहलीच्या एका निर्णयाने ऋषभ पंतचे करिअर धोक्यात

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापत झाल्याने ऋषभ पंतला विश्रांती देण्यात आली होती. त्यानंतर अद्याप त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही.

    हॅमिल्टन, 05 फेब्रुवारी : टी20 मालिकेनंतर आजपासून भारत-न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली. भारताने एकदिवसीय मालिकेसाठी संघात काही बदल केले आहेत. यामध्ये रोहित शर्मा दुखापतीमुळे बाहेर पडला असून त्याच्या जागी संघात शुभमन गिलला संधी मिळाली आहे. दरम्यान, प्लेइंग इलेव्हनमध्ये पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल यांची वर्णी लागली आहे. दोघांनीही वनडेत पदार्पण केलं. टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनची निवड करताना ऋषभ पंतला बाहेर ठेवण्यात आलं आहे. यामुळे आता त्याचं करिअर धोक्यात आलं असल्याचं म्हटलं जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुखापतीमुळे त्याला बाहेर बसावं लागलं होतं. त्याला न्यूझीलंडविरुद्ध संधी मिळाली नाही. पंतऐवजी टी20 मध्ये केएल राहुलकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आता वनडेमध्येही केएल राहुलच यष्टीरक्षण करणार आहे. सध्या तरी पंतबाबत कोणतंही वक्तव्य केलं नसलं तरी वनडेत केएल राहुलकडे जबाबदारी दिल्यानं पंतची कारकिर्द धोक्यात आल्याचं म्हटलं जात आहे. वर्ल्ड कपनंतर धोनी संघात खेळलेला नाही. तेव्हापासून यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंतच संघात आहे. निवड समितीनेही यापुढे यष्टीरक्षकाची जबाबदारी ऋषभ पंतकडेच असेल असं म्हटलं होतं. मात्र, त्याची कामगिरी म्हणावी तशी चांगली झाली नाही. यामुळे त्याच्यावर टीकाही होत आहे. यातच दुखापतीने त्याला बाहेर बसावं लागलं. टी20 मध्ये केएल राहुलने यष्टीरक्षण केलं पण आता एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्याच्याकडं जबाबदारी दिल्यानं हा पंतसाठी इशाराच आहे. केएल राहुलमुळे संघात अतिरिक्त गोलंदाजाला संधी मिळू शकते. तसंच टी20 पाठोपाठ वनडेतही केएल राहुल यष्टीरक्षण करत असल्याने पंतला जोरदार पुनरागमन करण्याची गरज आहे. पाणीपुरी विक्रेता ते शतकवीर मॅचविनर : एकाच वर्षात बदललं 'यशस्वी' आयुष्य कसोटी क्रिकेटमध्ये सध्या ऋद्धिमान साहा यष्टीरक्षण करतो. त्यामुळे ऋषभ पंतला टी20 आणि एकदिवसीय मध्ये कामगिरी सुधारण्याचे आव्हान आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्येही केएल राहुल यष्टीरक्षणासह फलंदाजीत यशस्वी ठरला तर पंतसाठी ही धोक्याची घंटा असेल. त्याला संघात पुनरागमन करण्यासाठी फलंदाजीतही सुधारणा करावी लागेल. न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, केदार जाधव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी सेमीफायनलमध्ये यशस्वीचे शतक, मुंबईत वडिलांना दिलेलं वचन आफ्रिकेत केलं पूर्ण
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Cricket, Virat kohli

    पुढील बातम्या