मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ मुंबई कसोटीत 4 विकेट्स घेत R Ashwinने तोडले साऊथ अफ्रिकेच्या 'या' दिग्गजाचे रेकॉर्ड

IND vs NZ मुंबई कसोटीत 4 विकेट्स घेत R Ashwinने तोडले साऊथ अफ्रिकेच्या 'या' दिग्गजाचे रेकॉर्ड

R Ashwin

R Ashwin

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात मुंबईत सुरू असलेल्या टेस्टवर टीम इंडियानं मजबूत पकड मिळवली आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

मुंबई, 5 डिसेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात मुंबईत सुरू असलेल्या टेस्टवर टीम इंडियानं मजबूत पकड मिळवली आहे. टीम इंडियाची पहिली इनिंग 325 रनवर संपुष्टात आली होती. त्याला उत्तर देताना न्यूझीलंडची संपूर्ण टीम फक्त 62 रनवर ऑल आऊट झाली. या इनिंगमध्ये भारताच्या गोलंदाजांनी अद्भुत अशी गोलंदाजी केली. न्यूझीलंडला या निच्चांकी धावसंख्येवर रोखण्यात भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन(R Ashwin)याचा मोठा वाटा राहिला. इतकेच नव्हे तर त्याने एका विक्रमात दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज गोलंदाज शॉन पॉलाक(Shaun Pollock) यांना मागे टाकले आहे. आणि कपिल देव यांच्या रेकॉर्डच्या नजीक पोहचला आहे.

न्यूझीलंडच्या या डावादरम्यान अश्विनने 8 षटके गोलंदाजी करताना केवळ 8 धावा देत 4विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याने 2 षटके निर्धाव टाकली. न्यूझीलंडचे हेन्री निकोलस, यष्टीरक्षक टॉम ब्लंडल, टीम साउदी आणि विलियम सोमरवील हे त्याचे शिकार बनले होते. यासह अश्विनने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 423 विकेट्सचा गाठला आहे. यासह तो पॉलाक यांच्यावर वरचढ ठरला आहे. पॉलाक यांनी कसोटी कारकिर्दीत 421 विकेट्स घेतल्या होत्या.

पॉलाक यांना मागे सोडत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत अश्विन 12 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. आता त्याच्यापुढे परदेशी गोलंदाजांसह भारताचे दिग्गज खेळाडू अनिल कुंबळे आणि कपिल देव यांचे सुद्धा आव्हान आहे. कुंबळे 132 कसोटी सामन्यांमध्ये 619 विकेट्स घेत या यादीत चौथ्या स्थानावर आहेत. तर कपिल देव 131 सामन्यांमधील 434 विकेट्ससह नवव्या स्थानावर आहेत. कपिल यांना मागे टाकण्यापासून अश्विन आता केवळ 11 विकेट्सने मागे आहे.

First published:

Tags: R ashwin