Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ : प्रत्येक फॉरमॅटसाठी वेगळी खेळाडू? द्रविडने सांगितली टीम इंडियाची Blue Print

IND vs NZ : प्रत्येक फॉरमॅटसाठी वेगळी खेळाडू? द्रविडने सांगितली टीम इंडियाची Blue Print

टीम इंडियाच्या नव्या पर्वाला न्यूझीलंडविरुद्धच्या (India vs New Zealand) पहिल्या टी-20 पासून सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) टीम इंडियाचा टी-20 फॉरमॅटचा कर्णधार झाला आहे, तर राहुल द्रविड (Rahul Dravid) पुढच्या दोन वर्षांसाठी टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

जयपूर, 16 नोव्हेंबर : टीम इंडियाच्या नव्या पर्वाला न्यूझीलंडविरुद्धच्या (India vs New Zealand) पहिल्या टी-20 पासून सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) टीम इंडियाचा टी-20 फॉरमॅटचा कर्णधार झाला आहे, तर राहुल द्रविड (Rahul Dravid) पुढच्या दोन वर्षांसाठी टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या टी-20 सीरिजला बुधवारी सुरुवात होणार आहे. याआधी राहुल द्रविडने पत्रकारांशी संवाद साधत भविष्यातल्या रणनितीवर भाष्य केलं. वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळी टीम असणार नाही, पण दीर्घकालीन रणनिती बनवावी लागेल, असं द्रविडने सांगितलं.

'अंडर-19 स्तरावर कोच म्हणून केलेल्या गोष्टीच इकडे केल्या जाऊ शकत नाहीत. मी तसं करणारही नाही. माझ्यासाठी ही शिकण्याची आणि खेळाडूंना जाणून घेण्याची संधी आहे. खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी काढून घेणं, ही कोच म्हणून जबाबदारी असेल. ज्युनियर लेव्हलला अंतिम लक्ष्य विजय असत नाही. पण सीनियर टीमकडून प्रत्येक मॅच जिंकण्याची अपेक्षा असते,' असं वक्तव्य द्रविडने केलं.

'संतुलन बनवणं गरजेचं आहे, आम्हाला प्रत्येक मॅच जिंकण्याचं लक्ष्य ठेवावं लागेल. दीर्घकालीन लक्ष्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. ही गोष्ट बबलमध्ये राहण्याचा थकवा आणि सध्याच्या परिस्थितीसाठीही लागू आहे. आम्ही खेळाडूंचं भविष्य आणि त्यांच्या दीर्घकालीन करियरचाही विचार करू, पण अल्पकालीन लक्ष्यासाठी त्यांच्या भल्याकडे दुर्लक्ष करणार नाही,' असा विश्वास द्रविडने व्यक्त केला.

'आता जिंकणं आणि भविष्यावर नजर ठेवणं, दोन्ही गरजेचं आहे. येणाऱ्या स्पर्धांचीही तयारी करायची आहे. भविष्याचा विचार करणं माझं काम आहे, मग मी कोणत्याही टीमचं कोचिंग करत असेन, हे बदलणार नाही. वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळ्या खेळाडूंचा विचार सुरू नाही, पण सगळे फॉरमॅट खेळणाऱ्या खेळाडूंना उचित आराम दिला जाईल,' असं द्रविडने सांगितलं.

केन विलियमसन आणि विराट कोहली भारत-न्यूझीलंड यांच्यातली टी-20 सीरिज खेळणार नाहीत. गेल्या काही काळापासून सतत क्रिकेट खेळत असल्यामुळे दोघांनीही आराम करायचा निर्णय घेतला आहे. 'एवढं क्रिकेट खेळलं जात आहे, त्यामुळे खेळाडूंना आराम गरजेचा आहे. फूटबॉलमध्येही खेळाडू प्रत्येक मॅच खेळत नाही. वर्ल्ड क्रिकेटमध्ये प्रत्येक टीमसाठी हे आव्हान आहे, आपल्याला खेळाडूंना आराम द्यावा लागेल,' असं मत द्रविडने मांडलं.

First published:

Tags: Rahul dravid, Rohit sharma, Team india