मुंबई, 3 डिसेंबर : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमधून (India vs New Zealand 2nd Test) पुनरागमन केलं आहे. टी-20 वर्ल्ड कपनंतर विराट कोहलीने विश्रांती घेतली होती, त्यामुळे तो न्यूझीलंडविरुद्धची तीन टी-20 मॅचची सीरिज आणि कानपूरमधली पहिली टेस्ट खेळला नव्हता. विराटने मोठ्या विश्रांतीनंतर पुनरागमन केलं असलं तरी त्याच्या पदरी पुन्हा निराशाच आली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या टेस्टमध्ये विराट शून्य रनवर आऊट झाला, असं असलं तरी विराटच्या या विकेटवर आता वाद निर्माण झाला आहे.
एजाझ पटेलने विराटला एलबीडब्ल्यू केलं. मैदानातले अंपायर नितीन मेनन (Umpire Nitin Menon) यांनी विराटला आऊट दिलं, यानंतर विराटने एकही क्षण न घालवता डीआरएस घेतला. बॉल बॅटला लागल्याचा विश्वास विराटला होता. थर्ड अंपायरनेही अनेकवेळा रिप्ले बघितले, पण तरीही थर्ड अंपायरला योग्य निर्णयापर्यंत पोहोचता आलं नाही, अखेर त्याने मैदानातल्या अंपायरने दिलेल्या निर्णयासोबत जायचं ठरवलं, ज्यामुळे विराटला माघारी परतावं लागलं.
You Got To Feel For Virat Kohli... It Seemed Bat First To Us; What About You Guys? @imVkohli • #IndvsNZtest • #TeamIndia pic.twitter.com/4fmkRstSzV
— ViratGang (@ViratGang) December 3, 2021
रिप्ले बघितल्यानंतर बॉल बॅट आणि पॅडला एकाच वेळी लागल्याचं वाटत होतं. बॉल जर पहिले पॅडला लागला असता तर विराट एलबीडब्ल्यू असता, पण जर बॉल आधी बॅटला आणि मग पॅडला लागला असता तर त्याला नॉट आऊट देण्यात आलं असतं. रिप्लेमध्ये बॉल बॅटला पहिले लागला का पॅडला हे स्पष्ट दिसत नव्हतं, त्यामुळे चाहते अंपायर नितीन मेनन आणि थर्ड अंपायरच्या निर्णयावरून अजिबात खुश नव्हते. विराट कोहलीही पॅव्हेलियनमध्ये जाताना या निर्णयावरून संतापला. बाऊंड्री लाईनवर विराटने जोरात बॅट आपटली.
Kohli unhappy, Team unhappy, Fans unhappy. There was an inside edge!! #ViratKohli #IndvsNZtest pic.twitter.com/x9eBjdm1Vu
— Atul Baral🇳🇵 (@Atul_Baral33) December 3, 2021
Clearly see there was deviation. Ball hit bat first. Virat Kohli immediately take review. Third umpire doing such mistake. Nothing is going good for Virat Kohli. #IndvsNZtest #ViratKohli pic.twitter.com/P3Ugpa3rY3
— Arjit Gupta (@guptarjit) December 3, 2021
विराट कोहलीला अशा पद्धतीने आऊट दिल्यामुळे अभिनेते परेश रावल हेदेखील चांगलेच संतापले. हा थर्ड अंपायर आहे का थर्ड क्लास अंपायरिंग सुरू आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याबाबतचं एक ट्वीट परेश रावल यांनी केलं आहे.
या सामन्यात मयंक अग्रवालने केलेल्या शतकामुळे टीम इंडियाला संकटातून बाहेर काढलं आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 221/4 एवढा झाला आहे. मयंक अग्रवाल 120 रनवर आणि ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) 25 रनवर खेळत आहे.
टॉस जिंकून पहिले बॅटिंगला आल्यानंतर टीम इंडियाचे ओपनर मयंक अग्रवाल आणि शुभमन गिल (Shubhaman Gill) यांनी चांगली सुरुवात केली. या दोघांमध्ये 80 रनची पार्टनरशीप झाली, पण शुभमन गिल 44 रनवर आऊट झाला. यानंतर लगेचच चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि विराट कोहली आऊट झाले. एजाझ पटेलने (Ajaz Patel) पुजारा आणि विराटला शून्य रनवर माघारी पाठवलं.
भारताची अवस्था 80/0 असताना काही मिनिटांमध्येच 80/3 झाली. यानंतर मयंक अग्रवालने श्रेयस अय्यरसोबत (Shreyas Iyer) 80 रनची पार्टनरशीप केली, पण श्रेयस अय्यर 18 रन करून आऊट झाला. न्यूझीलंडकडून स्पिनर एजाझ पटेल यानेच सगळ्या 4 विकेट घेतल्या आहेत.
अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane), रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि इशांत शर्मा (Ishant Sharma) यांना दुखापत झाल्यामुळे तिघांनाही टीमबाहेर बसावं लागलं आहे. विराट कोहलीने विश्रांतीनंतर टीम इंडियात पुनरागमन केलं आहे, त्यामुळे त्याने अजिंक्य रहाणेची जागा घेतली. तर रविंद्र जडेजाऐवजी जयंत यादव (Jayant Yadav) आणि इशांत शर्माऐवजी मोहम्मद सिराजला (Mohammad Siraj) संधी देण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Team india, Virat kohli