मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Ind vs NZ: पाऊस पडला, खेळ थांबला... पण तरीही भारत-न्यूझीलंड मॅच झाली 'टाय!' पण हे घडलं कसं?

Ind vs NZ: पाऊस पडला, खेळ थांबला... पण तरीही भारत-न्यूझीलंड मॅच झाली 'टाय!' पण हे घडलं कसं?

भारतानं जिंकली टी20 मालिका

भारतानं जिंकली टी20 मालिका

Ind vs NZ: या मॅचचा निकाल ना न्यूझीलंडच्या बाजूनं लागला ना भारताच्या बाजूनं. हा सामना चक्क टाय झाला. आणि त्यामुळे 1-0 अशा फरकानं हार्दिक पंड्याच्या टीम इंडियानं ही सिरीज 1-0 अशी खिशात घातली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नेपियर, 22 नोव्हेंबर: भारत आणि न्यूझीलंड संघात आज नेपियरमध्ये तिसरा टी20 सामना पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडनं भारतासमोर 161 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण पावसामुळे भारतीय डावाच्या 9व्या ओव्हरनंतर सामना सुरु झाला नाही. पण महत्वाची बाब ही की या मॅचचा निकाल ना न्यूझीलंडच्या बाजूनं लागला ना भारताच्या बाजूनं. हा सामना चक्क टाय झाला. आणि त्यामुळे 1-0 अशा फरकानं हार्दिक पंड्याच्या टीम इंडियानं ही सिरीज 1-0 अशी खिशात घातली. न्यूझीलंडमध्ये टीम इंडियानं मिळवलेला हा सलग दुसरा मालिकाविजय ठरला.

मॅच टाय कशी झाली?

161 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियानं 9 ओव्हर्समध्ये 4 बाद 75 धावांची मजल मारली होती. डकवर्थ लुईस नियमानुसार टीम इंडियाला 9 ओव्हर्समध्ये 75 पेक्षा जास्त धावा करणं गरजेचं होतं. पण स्कोअरबोर्डवर नेमक्या 75 धावाच होत्या. त्यामुळे हा सामना टाय अवस्थेत संपला. पावसामुळे सामना थांबला त्यावेळी भारताला जिंकण्यासाठी 66 बॉल्समध्ये 86 धावा हव्या होत्या. पण मॅच टाय झाल्याचा टीम इंडियाला एका अर्थानं फायदा झाला आणि भारतानं ही मालिका 1-0 अशा फरकानं जिंकली.

सिराजचं 'राज', अर्शदीप प्रभावी

त्याआधी मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंगच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझीलंडचा डाव अवघ्या 160 धावात आटोपला. सिराजनं अवघ्या 17 धावात 4 तर अर्शदीपनं 37 धावात 4 विकेट्स घेतल्या. तर हर्षल पटेलनं एक विकेट घेतली. टी20 क्रिकेटमध्ये दोन भारतीय गोलंदाजांची 4-4 विकेट्स घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली. न्यूझीलंडकडून कॉनवे आणि ग्लेन फिलिपनं अर्धशतकं झळकावली. पण इतर किवी खेळाडूंनी मात्र मैदानात केवळ हजेरी लावण्याचं काम केलं.

हेही वाचा - MS Dhoni: खरंच महेंद्रसिंग धोनीनं केली 'ही' मोठी चूक? तर 'त्या' एका निर्णयाचा होईल धोनी अँड कंपनीला पश्चाताप

हार्दिक पंड्याचा 'ग्रेट स्टार्ट'

बीसीसीआयनं न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्मा, विराट कोहली आणि लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्याकडे टीम इंडियानं नेतृत्व सोपवलं होतं. या दौऱ्यात वेलिंग्टनची पहिली टी20 पावसामुळे रद्द झाली. पण माऊंट माँगानुईमध्ये टीम इंडियानं यजमानांचा 65 धावांनी धुव्वा उडवला. तर नेपियरचा सामना टाय अवस्थेत संपला. त्यामुळे टी20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया पुन्हा फॉर्ममध्ये परतल्याचं चित्र आहे. त्याचबरोबर हार्दिक पंड्याकडे आता नियमितपणे टी20 टीमची जबाबदारी मिळण्याची शक्यता बळावली आहे.

First published:

Tags: Cricket, Sports, T20 cricket, Team india