Home /News /sport /

IND vs NZ : पराभवाच्या छायेत होती टीम इंडिया, पण 13 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर झाला चमत्कार

IND vs NZ : पराभवाच्या छायेत होती टीम इंडिया, पण 13 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर झाला चमत्कार

टीम इंडियाने विजय मिळवला असला तरी एक क्षण असा होता, जेव्हा सामन्यात न्यूझीलंडच्या संघाचं पारडं जड होतं.

    ऑकलंड, 02 फेब्रुवारी : टीम इंडियाने पाचव्या आणि अखेरच्या टी-ट्वेन्टी सामन्यात विजय मिळवत 5-0 ने न्यूझीलंडचा धुव्वा उडवला आहे. अखेरच्या षटकापर्यंत चाललेल्या या सामन्यात जरी टीम इंडियाने विजय मिळवला असला तरी एक क्षण असा होता, जेव्हा सामन्यात न्यूझीलंडच्या संघाचं पारडं जड होतं. भारताने दिलेल्या 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची अवस्था एकवेळ 3 बाद 17 अशी झाली होती. त्यानंतर रॉस टेलर आणि टिम सेफर्टने सावध खेळ करत डाव सावरला. 9 षटकांत न्यूझीलंडच्या 64 धावा झाल्या होत्या. दहाव्या षटकात सेफर्ट आणि टेलरने शिवम दुबेच्या एका षटकात 34 धावा वसूल करत सामन्याला कलाटणी दिली. त्यामुळे भारतीय चाहत्यांची धाकधूक वाढत चालली होती. रॉस टेलर आणि टिम सेफर्टच्या भागीदारीमुळे सामन्यावर न्यूझीलंडची पकड मजबूत होत असतानाच नवदीप सैनीने भारतीय चाहत्यांना सेलिब्रेशनची संधी दिली. तेराव्या षटकातील चौथ्या चेंडूवर सैनीने टिम सेफर्टला बाद केलं. त्यानंतर सामन्यावर भारतीय गोलंदाजांनी पकड मिळवली. टिम सेफर्टला नवदीप सैनीने बाद केल्यानंतर न्यूझीलंडचे खेळाडू एका पाठोपाठ एक बाद होत गेले. केएल राहुलने केलं टीम इंडियाचं नेतृत्व, चाहत्यांना झाली धोनीची आठवण; पाहा VIDEO सैनी, वॉशिंग्टन सुंदर आणि बुमराह यांच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझींलडचे तळाचे फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत आणि त्यांचा डाव 156 धावांत संपुष्टात आला. त्यामुळे पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात विजय मिळवत भारताने मालिकेत 5-0 असा न्यूझीलंडचा धुव्वा उडवला. तत्पूर्वी, सलामीला खेळणाऱ्या रोहित शर्माने या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली. त्याने संजू सॅमसनला सलामीला खेळवलं. मात्र तो फक्त दोन धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली. लोकेश राहुलसोबत त्याने डाव सावरला. लोकेश राहुल 45 धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्माने अर्धशतक साजरं केलं. पण 60 धावांवर त्याला रिटायर्ड हर्ट व्हावं लागलं. त्यानंतर श्रेयस अय्यरने अखेरच्या षटकात फटकेबाजी केल्यानं संघाच्या 20 षटकांत 3 बाद 163 धावा झाल्या. श्रेयस अय्यर 33 धावांवर तर मनिष पांडे 11 धावांवर नाबाद राहिले. रोहित शर्माने अर्धशतक साजरं करताना विराटला मागे टाकलं आहे. रोहितचं टी20 मधील हे 25 वे अर्धशतक असून विराट कोहली 24 अर्धशतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या गुप्टिलने 17 अर्धशतके केली आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Cricket, Ind vs nz

    पुढील बातम्या