Home /News /sport /

जगभरातील संघांनी ओळखला विराटचा 'हा' वीक पॉईंट, टीम इंडियाची डोकेदुखी वाढली!

जगभरातील संघांनी ओळखला विराटचा 'हा' वीक पॉईंट, टीम इंडियाची डोकेदुखी वाढली!

या सामन्यात विराट कोहलीने जरी अर्धशतकी खेळी केली असली तरीही विराटच्या वीक पाईंटने पुन्हा एकदा डोके वर काढलं आहे.

    हॅमिल्टन, 05 फेब्रुवारी : भारताने दिलेल्या आव्हानात्मक लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करत न्यूझीलंडच्या संघाने एकदिवसीय मालिकेची विजयी सुरुवात केली आहे. न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात भारतावर 4 गडी राखून विजय मिळवला. भारताने दिलेल्या 348 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीची जोडी बाद झाल्यानंतर रॉस टेलरने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. रॉस टेलरने लॅथमच्या साथीने महत्वपूर्ण अशी शतकी भागिदारी करत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. मार्टिन गुप्टिल आणि हेन्री निकोलस यांनी सुरुवातीला सावध खेळी केली. पण शार्दुल ठाकूरने मार्टिन गुप्टिलला केदार जाधवकडे झेल देण्यास भाग पाडलं. त्याच्यानंतर टॉम ब्लंडलला कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर केएल राहुलने यष्टीचित केलं. तत्पूर्वी, न्यूझीलंडने नाणेफेक प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना श्रेयस अय्यरचे शतक आणि विराट, केएल राहुल यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 50 षटकांत 4 बाद 347 धावा केल्या. भारताची सलामीची जोडी लवकर बाद झाली. तरी विराट कोहलीच्या अर्धशतकानंतर श्रेयस अय्यरने शतकी खेळी केली. त्याच्याशिवाय केएल राहुलनेही अर्धशतक केलं. या सामन्यात विराट कोहलीने जरी अर्धशतकी खेळी केली असली तरीही विराटच्या वीक पाईंटने पुन्हा एकदा डोके वर काढलं आहे. न्यूझीलंडचा लेग स्पिनर इश सोधी याच्या गुगलीवर विराट बाद झाला. यावेळी विराट पूर्णपणे गोंधळलेला असल्याचं पाहायला मिळालं. मागील चार एकदिवसीय सामन्यांपैकी तीन सामन्यांत विराट लेग स्पिनरचा शिकार ठरला आहे. ऑस्ट्रेलियात दौऱ्यावेळी लेग स्पिनर अॅडम झाम्पा याने विराटच्या झंझावाताला वेसन घातली होती. तर आता न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात यश सोधीच्या गुगलीवर विराट निरुत्तर झाला. त्यामुळे लेग स्पिनर विराटसाठी आव्हानात्मक ठरत आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. 2007 नंतर पुन्हा केलेली मोठी चूक टीम इंडियाला भोवली, भारताच्या पराभवाचं कारण विराट कोहली एकदा मैदानावर टिकला तर शतक पूर्ण केल्याशिवाय तो परतत नाही, अशी त्याची ख्याती तयार झाली आहे. मात्र गेल्या काही काळापासून सामन्याच्या मध्यावधीत गोलंदाजीसाठी येणारे लेग स्पिनर विराटसाठी डोकेदुखी ठरत आहेत. चांगला जम बसल्यानंतरही शतकापर्यंत पोहचण्यात विराट अपयशी ठरत आहे. विराटसारखा हुकुमी एका शेवटपर्यंत टिकत नसल्याने भारतीय संघालाही याचा फटका बसताना दिसत आहे. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये रनमशिन विराट लेग स्पिनर्सचं आव्हान कसं मोडून काढणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Cricket, Virat kohli

    पुढील बातम्या