Home /News /sport /

केएल राहुलने फलंदाजाला असं बाद केलं की चाहत्यांना झाली धोनीची आठवण; पाहा VIDEO

केएल राहुलने फलंदाजाला असं बाद केलं की चाहत्यांना झाली धोनीची आठवण; पाहा VIDEO

पाचव्या टी20 सामन्यात भारताने विराट कोहलीला विश्रांती दिली होती. त्याच्या अनुपस्थितीत रोहित शर्माकडे कर्णधारपद देण्यात आलं होतं मात्र दुखापतीमुळे रोहित क्षेत्ररक्षणासाठी न उतरल्यानं केएल राहुलने नेतृत्व केलं.

    ऑकलंड, 02 फेब्रुवारी : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी20 मालिकेत भारताचा फलंदाज केएल राहुल चमकला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अचानक त्याच्यावर यष्टीरक्षणाची जबाबदारी पडली. त्यानंतर त्याने यष्टीरक्षण आणि फलंदाजी अशा दोन्ही पातळीवर चांगली कामगिरी केली. इतकंच काय तर संघाला विजयही मिळवून दिला आहे. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या सामन्यात अचानक त्याच्यावर संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारीही आली. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माकडे कर्णधारपद होते. मात्र फलंदाजीवेळी रोहितला दुखापत झाल्याने केएल राहुलकडे नेतृत्व सोपवण्यात आलं. यातही त्याने आपले नेतृत्वगुण दाखवले आहेत. शिवम दुबेच्या एका षटकात 34 धावा गेल्यानतंर केएल राहुलने या परिस्थितही शांत राहून पुढची रणनिती आखली. त्याआधी त्याने सुरुवातीला पॉवर प्लेमध्ये न्यूझीलंडचा एक गडी धावबाद करण्यात महत्वाची भूमिका पार पाडली. चौथ्या षटकात त्याने न्यूझीलंडचा फलंदाज टॉम ब्रूसला धावबाद केलं. त्यावेळी सर्वांनाच धोनीची आठवण झाली. नवदीप सैनीच्या दुसऱ्या चेंडूवर टिम सेफर्ट चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात होता. त्यावेळी संजू सॅमसनने केलेला थ्रो पकडून केएल राहुलने सूर मारत ब्रूसला बाद केलं. केएल राहुलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात भारताने 7 धावांनी विजय मिळवला. भारताने दिलेल्या 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची अवस्था एकवेळ 3 बाद 17 अशी झाली होती. त्यानंतर रॉस टेलर आणि टिम सेफर्टने सावध खेळ करत डाव सावरला. 9 षटकांत न्यूझीलंडच्या 64 धावा झाल्या होत्या. त्यानतंर दहाव्या षटकात सेफर्ट आणि टेलरने शिवम दुबेच्या एका षटकात 34 धावा वसूल केल्या. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी सामन्यावर पकड मिळवली. टिम सेफर्टला नवदीप सैनीने बाद केल्यानंतर न्यूझीलंडचे खेळाडू एका पाठोपाठ एक बाद होत गेले. सैनी, वॉशिंग्टन सुंदर आणि बुमराह यांच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझींलडचे तळाचे फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत आणि त्यांचा डाव 156 धावांत संपुष्टात आला. तत्पूर्वी, सलामीला खेळणाऱ्या रोहित शर्माने या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली. त्याने संजू सॅमसनला सलामीला खेळवलं. मात्र तो फक्त दोन धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली. लोकेश राहुलसोबत त्याने डाव सावरला. लोकेश राहुल 45 धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्माने अर्धशतक साजरं केलं. पण 60 धावांवर त्याला रिटायर्ड हर्ट व्हावं लागलं. त्यानंतर श्रेयस अय्यरने अखेरच्या षटकात फटकेबाजी केल्यानं संघाच्या 20 षटकांत 3 बाद 163 धावा झाल्या. श्रेयस अय्यर 33 धावांवर तर मनिष पांडे 11 धावांवर नाबाद राहिले. 'विराटने पंतसोबत तसं करू नये', सेहवागचा धोनीवर गंभीर आरोप रोहित शर्माने अर्धशतक साजरं करताना विराटला मागे टाकलं आहे. रोहितचं टी20 मधील हे 25 वे अर्धशतक असून विराट कोहली 24 अर्धशतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या गुप्टिलने 17 अर्धशतके केली आहे. 6 6 4 1 4 6 6 , टेलर आणि सेफर्टने केली दुबेची धुलाई
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या