विल्यम्सनच्या एका निर्णयामुळे सुपर ओव्हरआधीच नक्की झाला होता भारताचा विजय

विल्यम्सनच्या एका निर्णयामुळे सुपर ओव्हरआधीच नक्की झाला होता भारताचा विजय

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारताच्या रोहित शर्माने सुपर ओव्हरमध्ये अखेरच्या दोन चेंडूवर षटकार खेचत न्यूझीलंडच्या तोंडातून घास हिरावून घेतला.

  • Share this:

हॅमिल्टन, 29 जानेवारी : न्यूझीलंड आणि भारत य़ांच्यातील तिसऱ्या टी20 सामन्यात सुपर ओव्हरचा थरार रंगला होता. यामध्ये भारताचा हिटमॅन रोहित शर्माने सलग दोन षटकार खेचून धमाकेदार विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेत 3-0 ने आघाडी घेतली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 179 धावा केल्या होत्या. त्यानंतर न्यूझीलंडला 6 बाद 179 धावाच करता आल्या.

सुपर ओव्हरमध्ये भारताच्या जसप्रीत बुमराहने गोलंदाजी करताना 17 धावा दिल्या. त्यानंतर न्यूझीलंडकडून टीम साउथीने गोलंदाजी केली. अखेरच्या चेंडूवर 4 धावांची गरज असताना रोहित शर्माने साउथीच्या गोलंदाजीवर षटकार खेचून विजय मिळवून दिला. न्यूझीलंडकडून सुपर ओव्हरमध्ये केन विल्यमसन आणि मार्टिन गुप्टिल मैदानात उतरले. 6 चेंडूत या दोघांनी 17 धावा केल्या.  जसप्रीत बुमराहने टाकलेल्या या षटकात पहिल्या चेंडूवर विल्यमसनने एकेरी धाव घेतली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर गुप्टिल एकच धाव घेऊ शकला. तिसऱ्या चेंडूवर विल्यमसनने षटकार आणि चौथ्या चेंडूवर चौकार मारला. पाचव्या चेंडूवर एक चोरटी धाव घेतली. सहाव्या चेंडूवर गुप्टीलने चौकार मारून संघाच्या 17 धावा केल्या.

भारताचा केएल राहुल आणि रोहित शर्मा फलंदाजीला मैदानात उतरले तेव्हा न्यूझीलंडने टीम साउथीला गोलंदाजी दिली. न्यूझीलंडच्या या दिग्गज गोलंदाजाला आतापर्यंत सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवून देता आलेला नाही. 2012 पासून त्याने न्यूझीलंडकडून अनेकदा सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी केली आहे. मात्र ते सामने

2012 मध्ये लंके विरुद्धच्या सामन्यात साउथीने 13 धावा दिल्या होत्या. त्यानंतर विंडिजविरुद्धही त्याच वर्षी 19 धावा दिल्या होत्या. न्यूझीलंडने दोन्ही सामने गमावले होते. 2019 मध्ये इंग्लंडविरुद्धही सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी केली होती.  त्यात साऊथीने 17 धावा केल्या.

तिसऱ्या टी-20मध्ये सुपर ओव्हरचा थरार, सलग 2 षटकार खेचत हिटमॅनने मिळवून दिला विजय

भारताविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात साऊथीने सुपर ओव्हरमध्ये 20 धावा दिल्या. सुपर ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजांमध्येही त्याचा दुसरा क्रमांक लागतो. न्यूझीलंडच्या डॅनियल व्हिट्टोरीने 2008 मध्ये विंडिजविरुद्ध 25 धावा दिल्या होत्या. तिसऱ्या क्रमांकावरही टीम साऊथी आहे. बुमराह या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 17 धावा दिल्या.

असा रंगला सुपर ओव्हरचा थरार, रोहित शर्माने 2 चेंडूत फिरवला सामना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Jan 29, 2020 07:00 PM IST

ताज्या बातम्या