2007 नंतर पुन्हा केलेली मोठी चूक टीम इंडियाला भोवली, भारताच्या पराभवाचं कारण

2007 नंतर पुन्हा केलेली मोठी चूक टीम इंडियाला भोवली, भारताच्या पराभवाचं कारण

न्यूझीलंडविरुद्ध 347 धावांचा डोंगर उभारल्यानतंरही भारताला विजय मिळवता आला नाही.

  • Share this:

हॅमिल्टन, 05 फेब्रुवारी : न्यूझीलंडविरुद्ध 347 धावांचा डोंगर उभारल्यानतंरही भारताला विजय मिळवता आला नाही. न्यूझीलंडच्या रॉस टेलरच्या वादळात भारतीय गोलदाजी अचूक मारा करू शकली नाही. गोलंदाजांनी दिलेल्या अवांतर धावांनीच न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. भारताने वाइड टाकलेले चेंडू वजा केले तर न्यूझीलंडला सामना जिंकणं जड गेलं असतं.

भारताने याआधी सर्वाधिक 26 वाइड चेंडू 2007 मध्ये टाकले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा सामना भारताला गमवावा लागला होता. ऑस्ट्रेलियाने 193 धावा केल्या होत्या. मात्र, मुंबईत झालेला सामना भारताने जिंकला होता. आजच्या न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अवांतर धावांची खैरात केली. भारताच्या गोलंदाजांनी 24 वाइड टाकले. यात एकट्या बुमराहने 13 चेंडू वाइड टाकले. त्याच्यानंतर मोहम्मद शमीने 7 तर शार्दुल ठाकुरने 2 गडी बाद केले.

भारताने दिलेल्या 348 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीची जोडी बाद झाल्यानंतर रॉस टेलरने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. लॅथमच्या साथीने महत्वपूर्ण अशी शतकी भागिदारी करत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. मार्टिन गुप्टिल आणि हेन्री निकोलस यांनी सुरुवातीला सावध खेळी केली. पण शार्दुल ठाकूरने मार्टिन गुप्टिलला केदार जाधवकडे झेल देण्यास भाग पाडलं. त्याच्यानंतर टॉम ब्लंडलला कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर केएल राहुलने यष्टीचित केलं.

विराटचा थ्रो पाहून जॉन्टी ऱ्होड्सला विसराल, VIDEO एकदा बघाच

न्यूझीलंडची अवस्था 20 षटकांत 2 बाद 110 अशी झाली होती.  त्यानंतर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात असेलल्या हेन्री निकोलसला विराट कोहलीने धावबाद केलं. निकोलस बाद झाल्यानंतर रॉस टेलर आणि लॅथम यांनी डाव सावरला. दोघांनी 129 धावांची भागिदारी करत संघाला विजयाच्या समीप नेलं. मात्र, लॅथम कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 48 चेंडूत 69 धावा केल्या. रॉस टेलरने 73 चेंडूत शतक साजरं केलं.

कर्णधार विराट कोहलीची 'दादा'गिरी, अर्धशतकासह नोंदवले हे विक्रम

तत्पूर्वी, न्यूझीलंडने नाणेफेक प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना श्रेयस अय्यरचे शतक आणि विराट, केएल राहुल यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 50 षटकांत 4 बाद 347 धावा केल्या. भारताची सलामीची जोडी लवकर बाद झाली. तरी विराट कोहलीच्या अर्धशतकानंतर श्रेयस अय्यरने शतकी खेळी केली. त्याच्याशिवाय केएल राहुलनेही अर्धशतक केलं.

विराट कोहलीच्या एका निर्णयाने ऋषभ पंतचे करिअर धोक्यात

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Feb 5, 2020 03:48 PM IST

ताज्या बातम्या