• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • 'रन कर नाही तर...' हरभजन सिंहने 'या' दिग्गज खेळाडूला दिला गंभीर इशारा

'रन कर नाही तर...' हरभजन सिंहने 'या' दिग्गज खेळाडूला दिला गंभीर इशारा

harbhajan singh

harbhajan singh

भारतीय क्रिकेट संघ गुरुवारपासून न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सिरीजला (IND vs NZ)सुरुवात करणार आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर: भारतीय क्रिकेट संघ गुरुवारपासून न्यूझीलंडविरुद्धच्या (IND vs NZ) टेस्ट सिरीजला सुरुवात करणार आहे. पहिला सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर होणार आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाची कमान अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane)खांद्यावर असणार आहे. तत्पूर्वी, टीम इंडियाचा माजी क्रिकेटर हरभजन सिंहने (Harbhajan Singh) अजिंक्य रहाणेला गंभीर इशारा दिला आहे. अजिंक्य रहाणे भारतीय कसोटी संघाच्या मध्यक्रमातील सर्वोत्तम फलंदाज आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून तो मोठी खेळी करण्यास अपयशी ठरत आहे. त्याने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शतक झळकावले होते, तर यावर्षी त्याला केवळ 2 अर्धशतक झळकवण्यात यश आले आहे. त्याने या वर्षी 19 डावात 19.58 च्या सरासरीने 372 धावा केल्या आहेत. रहाणेच्या खराब खेळीवर हरभजनने स्पोर्ट्सकीडाशी संवाद साधताना भाष्य केले आहे. ''विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रहाणे होता. तो संघातील आपले स्थान वाचवू शकेल की नाही याबद्दल आम्हाला शंका होती. पण पहिल्या कसोटी सामन्यासाठी त्याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले. त्याच्या शेवटच्या 11 सामन्यांवर नजर टाकली तर त्याची सरासरी फक्त 19 आहे. तो एक हुशार क्रिकेटपटू आहे. पण त्याची अलीकडची कामगिरी याची खात्री देत ​​नाही. रोहित, विराट आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचाही विचार चांगला आहे की त्यांनी रहाणेवर विश्वास ठेवला की तो संघात असावा. तसेच रहाणे धावा करेल आणि संघाला पुढे नेईल, अशी आशा असल्याचे हरभजनने म्हटले आहे. तो म्हणाला, “त्याला कर्णधारपद देण्यात आले आहे. मला आशा आहे की तो संघाला पुढे नेईल आणि बॅटची जादू दाखवे. असे सांगत, रहाणने धावा केल्या नाही तर अनेक खेळाडू त्याच्या मागे रांगेत उभे आहेत. रांग खूप लांब आहे. सूर्यकुमार यादवही रांगेत थांबला आहे. असा गंभीर इशारा हरभजनने रहाणेला दिला आहे. यापूर्वी, हाणेची पुजाराकडून पाठराखण करण्यात आली होती. पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी झालेल्या वर्चुअल पत्रकार परिषदेत बोलताना चेतेश्वर पुजारा रहाणेबद्दल म्हणाला की, “तो एक अद्भुत खेळाडू आहे. खेळाडूंसोबत अनेकदा असे होत असते जेव्हा त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो. हा खेळातील एक भाग आहे. चढ-उतार तर येणारच. मला वाटते की, तो आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेला खेळाडू आहे, जो आपल्या खेळावर भरपूर मेहनत घेत असतो. मला माहित आहे फक्त एक मोठी खेळी आणि तो फॉर्ममध्ये येईल.” तसेच तो पुढे म्हणाला की, “तो नेट्समध्ये भरपूर मेहनत करतोय. मी पाहिलं, तो ज्याप्रकारे मेहनत घेतोय त्यावरून तो चांगल्याच लयीत असल्याचे दिसून येत आहे. मी आशा करतो की, तो मालिकेत भरपूर धावा करेल.” असा विश्वास त्याने यावेळी व्यक्त केला होता.
  Published by:Dhanshri Otari
  First published: