मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ : रोहित कॅप्टन होताच टीम इंडियामध्ये 5 बदल, पहिल्याच सामन्यात मिळाला विजय

IND vs NZ : रोहित कॅप्टन होताच टीम इंडियामध्ये 5 बदल, पहिल्याच सामन्यात मिळाला विजय

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा (India vs New Zealand) धमाकेदार विजय झाला आहे. न्यूझीलंडने दिलेलं 165 रनचं आव्हान टीम इंडियाने 19.4 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून पार केलं. टी-20 फॉरमॅटचा पूर्णवेळ कॅप्टन झाल्यानंतर रोहित शर्माची (Rohit Sharma) ही पहिलीच मॅच होती.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

जयपूर, 17 नोव्हेंबर : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा (India vs New Zealand) धमाकेदार विजय झाला आहे. न्यूझीलंडने दिलेलं 165 रनचं आव्हान टीम इंडियाने 19.4 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून पार केलं. टी-20 फॉरमॅटचा पूर्णवेळ कॅप्टन झाल्यानंतर रोहित शर्माची (Rohit Sharma) ही पहिलीच मॅच होती, तसंच टीम इंडियाचा मुख्य कोच म्हणून राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) कार्यकाळालाही सुरुवात झाली आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक झाली होती. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाल्यानंतर भारताचं आव्हान सुपर-12 स्टेजलाच संपुष्टात आलं होतं. यानंतर टीम इंडियात रोहित शर्मा आणि राहुल द्रविड पर्व सुरू झालं. रोहित आणि द्रविड यांच्या जोडीला पहिल्याच सामन्यात यश मिळालं. यासाठी या दोघांची बदलेली रणनितीही महत्त्वाची ठरली.

टॉस जिंकला

टी-20 वर्ल्ड कपमध्ये टॉसची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) टॉस गमावला. युएईतल्या खेळपट्टीवर दवामुळे दुसऱ्यांदा बॉलिंग करणं कठीण होतं. मैदानात मोठ्या प्रमाणावर दव असल्यामुळे बॉलर्सना बॉल पकडण्यात अडचणी निर्माण होतात, तसंच खेळपट्टीवर दव पडल्यामुळे बॅटरना बॉल बॅटवर येण्यासाठीही मदत होते. जयपूरमध्ये झालेल्या टी-20 मध्येही मोठ्या प्रमाणावर दव पडलं होतं, पण रोहित शर्माने टॉस जिंकल्यामुळे भारताला विजय मिळवण्यासाठी मोठी मदत झाली.

भुवी-अश्विन फॉर्ममध्ये

भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि आर.अश्विनला (R Ashwin) गवसलेला सूरही टीम इंडियासाठी महत्त्वाचा ठरला. भुवनेश्वर कुमारने पहिल्याच ओव्हरच्या तिसऱ्या बॉलला विकेट घेत टीमला चांगली सुरुवात करून दिली. भुवीने 4 ओव्हरमध्ये 24 रन देऊन 2 विकेट घेतल्या. याआधी आयपीएल आणि टी-20 वर्ल्ड कपमध्ये भुवनेश्वर कुमारला संघर्ष करावा लागला. खराब कामगिरीमुळे भुवनेश्वर कुमारला टी-20 वर्ल्ड कपमध्ये सुरुवातीच्या सामन्यानंतरच टीममधून डच्चू देण्यात आला. एवढच नाही तर त्याच्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी झालेल्या निवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं, पण भुवीने पहिल्याच ओव्हरमध्ये स्वत:ची निवड योग्य ठरवली.

अश्विननेही 4 ओव्हरमध्ये 23 रन देऊन 2 विकेट पटकावल्या आणि आपलं टीममधलं पुनरागमन सार्थ ठरवलं. 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आर.अश्विनला वनडे आणि टी-20 टीममधून बाहेर करण्यात आलं, पण टी-20 वर्ल्ड कपमध्ये अश्विनची निवड झाली. टीममध्ये निवड होऊनही विराटने अश्विनऐवजी वरुण चक्रवर्तीवर विश्वास दाखवला. पहिल्या दोन सामन्यांनंतर मात्र अश्विनचं टीममध्ये पुनरागमन झालं. आता अश्विनने आपली निवड योग्य असल्याचं सिद्ध केलं.

शेवटच्या ओव्हर्समध्ये टिच्चून बॉलिंग

या सामन्यात न्यूझीलंड 180-185 रनपर्यंत मजल मारेल, असं वाटलं होतं. पण भारतीय बॉलर्सनी शेवटच्या काही ओव्हर्समध्ये टिच्चून बॉलिंग करत किवी टीमला 164 रनवरच रोखलं.

राहुल-रोहितची आक्रमक बॅटिंग

न्यूझीलंडने दिलेल्या 165 रनच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारताच्या ओपनर्सनी धमाकेदार सुरुवात केली. रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या (KL Rahul) जोडीने 5 ओव्हरमध्ये 50 रनची पार्टनरशीप केली.

सूर्याच्या करियरमधली बेस्ट खेळी

तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगची संधी मिळालेल्या सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) त्याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय करियरमधली सर्वोत्तम खेळी केली. सूर्यकुमारने 40 बॉलमध्ये 62 रन केले, यामध्ये 6 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता.

First published:

Tags: New zealand, Rohit sharma, T20 cricket, Team india