Home /News /sport /

IND VS NZ : कोणत्या 2 खेळाडूंमुळे पराभूत झाली टीम इंडिया? कॅप्टन कोहलीने केला खुलासा

IND VS NZ : कोणत्या 2 खेळाडूंमुळे पराभूत झाली टीम इंडिया? कॅप्टन कोहलीने केला खुलासा

न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात भारतावर 4 गडी राखून विजय मिळवला.

    हॅमिल्टन, 05 फेब्रुवारी : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात मोठी धावसंख्या उभारल्यानंतरही टीम इंडियाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात भारतावर 4 गडी राखून विजय मिळवला. भारताने दिलेल्या 348 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. न्यूझीलंडची सलामीची जोडी बाद झाल्यानंतर रॉस टेलरने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. लॅथमच्या साथीने महत्वपूर्ण अशी शतकी भागिदारी करत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. मार्टिन गुप्टिल आणि हेन्री निकोलस यांनी सुरुवातीला सावध खेळी केली. मोठी धावसंख्या उभारूनही पराभवाची चव चाखावी लागल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे. 'न्यूझीलंडच्या टॉम लॅथमने 48 चेंडूंमध्ये केलेल्या 69 धावांच्या खेळीने सामना भारतापासून दूर गेला. न्यूझीलंडच्या संघाने दमदार कामगिरी केली. 348 धावांचं लक्ष्य न्यूझीलंडसाठी आव्हानात्मक ठरेल, असा आमचा अंदाज होता. मात्र अनुभवी रॉस टेलर आणि टॉम लॅथम यांच्या फलंदाजीमुळे सामन्याला कलाटणी मिळाली. भारताचं क्षेत्ररक्षणही खराबं झालं. कुलदीप यादवने एक झेल सोडला. तसंच गोलंदाजांनीही अपेक्षित कामगिरी केली नाही,' असं विराट कोहली म्हणाला. विराट कोहलीच्या एका निर्णयाने ऋषभ पंतचे करिअर धोक्यात दरम्यान, न्यूझीलंडने नाणेफेक प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना श्रेयस अय्यरचे शतक आणि विराट, केएल राहुल यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 50 षटकांत 4 बाद 347 धावा केल्या. भारताची सलामीची जोडी लवकर बाद झाली. तरी विराट कोहलीच्या अर्धशतकानंतर श्रेयस अय्यरने शतकी खेळी केली. त्याच्याशिवाय केएल राहुलनेही अर्धशतक केलं. टीम इंडियाच्या डावाची सुरुवात पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल यांनी केली. वनडेमध्ये पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या दोघांनीही सावध सुरुवात केली. मात्र पृथ्वी शॉ 20 धावांवर बाद झाला. पृथ्वी शॉ पाठोपाठ मयंक अग्रवालही 32 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने डाव सावरला. दोघांनी शतकी भागिदारी करत संघाचे दीड शतक पूर्ण केलं. विराट कोहलीने 61 चेंडूत अर्धशतक साजरं केलं. विराट 51 धावांवर बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि श्रेयस अय्यरने शतकी भागिदारी करत डाव सावरला. जेम्स निशामने 17 व्या षटकात श्रेयस अय्यरला जीवदान दिलं. त्याचा लाभ अय्यरने उठवत शतक साजरं केल. श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि केदार जाधव यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा पुरेपूर समाचार घेतला. अय्यर बाद झाल्यानंतर राहुल आणि केदार जाधव यांनी 25 चेंडूतच 50 धावांची भागिदारी केली. केएल राहुल 88 धावांवर नाबाद राहिला तर केदार जाधव 26 धावांवर नाबाद राहिला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडने चांगला खेळ करत भारतीय गोलंदाजांची चांगलीच दमछाक केली. सलामीची जोडी बाद झाल्यानंतर रॉस टेलरने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. लॅथमच्या साथीने महत्वपूर्ण अशी शतकी भागिदारी करत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. मार्टिन गुप्टिल आणि हेन्री निकोलस यांनी सुरुवातीला सावध खेळी केली. पण शार्दुल ठाकूरने मार्टिन गुप्टिलला केदार जाधवकडे झेल देण्यास भाग पाडलं. त्याच्यानंतर टॉम ब्लंडलला कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर केएल राहुलने यष्टीचित केलं. न्यूझीलंडची अवस्था 20 षटकांत 2 बाद 110 अशी झाली होती. त्यानंतर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात असेलल्या हेन्री निकोलसला विराट कोहलीने धावबाद केलं. निकोलस बाद झाल्यानंतर रॉस टेलर आणि लॅथम यांनी डाव सावरला. दोघांनी 129 धावांची भागिदारी करत संघाला विजयाच्या समीप नेलं. मात्र, लॅथम कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 48 चेंडूत 69 धावा केल्या. रॉस टेलरने 73 चेंडूत शतक साजरं केलं.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Virat kohli

    पुढील बातम्या