न्यूझीलंडच्या एका खेळाडूने केलेली चूक दुसऱ्याने सुधारली पण तोपर्यंत उशीर झाला

न्यूझीलंडच्या एका खेळाडूने केलेली चूक दुसऱ्याने सुधारली पण तोपर्यंत उशीर झाला

श्रेयस अय्यरचे शतक आणि विराट, केएल राहुल यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्ध 50 षटकांत 4 बाद 347 धावा केल्या.

  • Share this:

हॅमिल्टन, 05 फेब्रुवारी : टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात धावांचा डोंगर उभा केला. श्रेयस अय्यरचे शतक आणि विराट, केएल राहुल यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने 50 षटकांत 4 बाद 347 धावा केल्या. श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि केदार जाधव यांनी तुफान फटकेबाजी करत संघाच्या धावा वाढवल्या. शतकी खेळी करणाऱ्या श्रेयस अय्यर फक्त 8 धावांवर खेळत असताना जीवदान मिळालं होतं. त्याचा फायदा घेत अय्यरनं शतक ठोकलं.

श्रेयस अय्यरने 107 चेंडूत 103 धावा केल्या. यामध्ये त्याने 11 चौकार आणि एक षटकार मारला. त्याआधी दोनवेळा श्रेयस अय्यरला जीवदान मिळालं. 17 व्या षटकात रॉस टेलरने झेल सोडला तेव्हा 8 धावांवर तर 41 व्या षटकात कुलिन डी ग्रँडहोमने झेल सोडला तेव्हा अय्यर 83 धावांवर खेळत होते. शतक झाल्यानंतर श्रेयस अय्यर टिम साउदीच्या गोलंदाजीवर सँटनरच्या हाती झेल देऊन बाद झाला.

फलंदाजी करताना श्रेयस अय्यरच्या हाताला त्रास जाणवत होता. सामन्यात दोन वेळा त्यानं फिजिओंची मदतही घेतली. हात दुखत असतानाही तो खेळला आणि वनडे कारकिर्दीतील पहिलं शतक साजरं केलं. यासह त्याने संघाला आव्हानात्मक धावसंख्याही उभारून दिली.

तत्पूर्वी, न्यूझीलंडने नाणेफेक प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना श्रेयस अय्यरचे शतक आणि विराट, केएल राहुल यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 50 षटकांत 4 बाद 347 धावा केल्या. भारताची सलामीची जोडी लवकर बाद झाली. तरी विराट कोहलीच्या अर्धशतकानंतर श्रेयस अय्यरने शतकी खेळी केली. त्याच्याशिवाय केएल राहुलनेही अर्धशतक केलं. टीम इंडियाच्या डावाची सुरुवात पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल यांनी केली. वनडेमध्ये पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या दोघांनीही सावध सुरुवात केली. मात्र पृथ्वी शॉ 20 धावांवर बाद झाला.

पृथ्वी शॉ पाठोपाठ मयंक अग्रवालही 32 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने डाव सावरला. दोघांनी शतकी भागिदारी करत संघाचे दीड शतक पूर्ण केलं. विराट कोहलीने 61 चेंडूत अर्धशतक साजरं केलं. विराट 51 धावांवर बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि श्रेयस अय्यरने शतकी भागिदारी करत डाव सावरला. अय्यर बाद झाल्यानंतर राहुल आणि केदार जाधव यांनी 25 चेंडूतच 50 धावांची भागिदारी केली. केएल राहुल 88 धावांवर नाबाद राहिला तर केदार जाधव 26 धावांवर नाबाद राहिला.

कर्णधार विराट कोहलीची 'दादा'गिरी, अर्धशतकासह नोंदवले हे विक्रम

First published: February 5, 2020, 12:39 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading