मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs NZ : आऊट का नॉट आऊट? विराटच्या विकेटनंतर मोठा वाद, VIDEO

IND vs NZ : आऊट का नॉट आऊट? विराटच्या विकेटनंतर मोठा वाद, VIDEO

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टला (India vs New Zealand 2nd Test) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरुवात झाली आहे. या सामन्यातून टीम इंडियात पुनरागमन करणाऱ्या विराट कोहलीच्या विकेटनंतर (Virat Kohli Wicket Controversy) नवा वाद निर्माण झाला आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 3 डिसेंबर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टला (India vs New Zealand 2nd Test) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरुवात झाली आहे. खराब हवामानामुळे हा सामना पहिल्या दिवशी लंचनंतर सुरू झाला. टीम इंडियामध्ये विश्रांतीनंतर पुनरागमन करणाऱ्या कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि शुभमन गिल (Shubhaman Gill) या ओपनरनी टीम इंडियाला 80 रनची ओपनिंग पार्टनरशीप करून दिली, पण यानंतर भारताच्या लागोपाठ तीन विकेट गेल्या आणि टीमचा स्कोअर 80/3 असा झाला. शुभमन गिल 44 रनवर आऊट झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि विराट कोहली (Virat Kohli) शून्य रनवर आऊट झाले.

चेतेश्वर पुजाराला एजाझ पटेलने (Ajaz Patel) बोल्ड केलं, तर यानंतर लगेच त्यानेच विराट कोहलीला एलबीडब्ल्यू केलं. एजाझ पटेलने एकाच ओव्हरमध्ये टीम इंडियाचे दिग्गज असलेल्या पुजारा आणि विराटला माघारी पाठवलं, असं असलं तरी आता विराटच्या विकेटवरून वाद सुरू झाला आहे.

विराट कोहलीला मैदानातले अंपायर नितीन मेनन यांनी आऊट दिलं, यानंतर विराटने एकही क्षण न घालवता डीआरएस घेतला. बॉल बॅटला लागल्याचा विश्वास विराटला होता. थर्ड अंपायरनेही अनेकवेळा रिप्ले बघितले, पण तरीही थर्ड अंपायरला योग्य निर्णयापर्यंत पोहोचता आलं नाही, अखेर त्याने मैदानातल्या अंपायरने दिलेल्या निर्णयासोबत जायचं ठरवलं, ज्यामुळे विराटला माघारी परतावं लागलं.

रिप्ले बघितल्यानंतर बॉल बॅट आणि पॅडला एकाच वेळी लागल्याचं वाटत होतं. बॉल जर पहिले पॅडला लागला असता तर विराट एलबीडब्ल्यू असता, पण जर बॉल आधी बॅटला आणि मग पॅडला लागला असता तर त्याला नॉट आऊट देण्यात आलं असतं. रिप्लेमध्ये बॉल बॅटला पहिले लागला का पॅडला हे स्पष्ट दिसत नव्हतं, त्यामुळे चाहते अंपायर नितीन मेनन आणि थर्ड अंपायरच्या निर्णयावरून अजिबात खुश नव्हते. विराट कोहलीही पॅव्हेलियनमध्ये जाताना या निर्णयावरून संतापला. बाऊंड्री लाईनवर विराटने जोरात बॅट आपटली.

भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर यानेही या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली. 'माझ्या मते बॉल पहिले बॅटला लागला. परिस्थितीजन्य पुरावा हा मुद्दा समजू शकतो, पण कॉमन सेन्स वापरण्याची गरज होती, पण कॉमन सेन्स कॉमन नसतो. विराटसाठी वाईट वाटतं,' असं ट्वीट वसीम जाफरने केलं.

अंपायर नितीन मेनन हे भारत न्यूझीलंड यांच्यात कानपूरमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टवेळीही वादात सापडले होते. पहिल्या टेस्टच्या अखेरच्या दिवशी बॅड लाईटच्या मुद्द्यावरून नितीन मेनन यांना ट्रोल केलं गेलं, तसंच त्याच सामन्यात त्यांच्यात आणि आर.अश्विन यांच्यात बाचाबाचीही झाली.

कानपूर टेस्ट ड्रॉ झाल्यानंतर अंपायर नितीन मेनन निशाण्यावर, जाणून घ्या कारण

First published:

Tags: Team india, Virat kohli