• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • आवेश खानने Rahul Dravid च्या 'त्या' खास शैलीचा केला खुलासा

आवेश खानने Rahul Dravid च्या 'त्या' खास शैलीचा केला खुलासा

Rahul Dravid’s diary

Rahul Dravid’s diary

राहुल द्रविड नेहमी स्वतःसोबत एक डायरी(Rahul Dravid’s diary) का ठेवतो? 24 वर्षीय आवेश खानने (Avesh Khan) सांगितले कारण.

 • Share this:
  नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर: भारत आणि न्यूझीलंड(IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 सिरीजमधील (T20)शेवटची मॅच रविवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आली. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 73 धावांनी पराभव करत सिरीज 3-0 ने जिंकली. या सिरीजसाठी संघाचा हिस्सा बनलेल्या आवेश खानने (Avesh Khan) भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडबाबत (Rahul Dravid) अनेक खुलासे केले आहेत.

  द्रविडच्या डायरीतले शेअर केले खास सिक्रेट्स

  आवेशने स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत राहुल द्रविडची डायरी शेअर केली आहे. राहुल द्रविड सामन्यातील प्रत्येक खेळाडूच्या चुका त्याच्या डायरीत लिहितो. कोणत्या खेळाडूने काय चूक केली. एखाद्या खेळाडूने चांगले काम केले असेल, या गोष्टींची नोंद तो त्याच्या डायरीत ठेवत असतो. यानंतर टीम मीटिंगमध्ये तो त्या सर्व गोष्टी सांगतो. प्रत्येक खेळाडूला एक-एक करून त्याच्या चुका सांगतो, त्याने काही चांगले केले असेल तर त्याचं कौतुक करतो. कोणत्या दुरुस्त्या करायला हव्यात, कुठे सुधारणे आवश्यक आहे, याबद्दल राहुल खेळाडूंना मार्गदर्शन करतो. द्रविडच्या या खास शैलीची किस्सा शेअर करत आवेशने त्याच्या डायरीतील सिक्रेट्स सांगितले आहेत. तसेच, द्रविड म्हणतो की, चुका सर्व खेळाडूंकडून होतात पण तुम्ही त्यात किती लवकर सुधारणा करता हे जास्त महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमच्या चुकांमधून जितके जास्त शिकाल, तितक्या लवकर तुम्ही एक चांगला क्रिकेटर व्हाल. असा कानमंत्रही द्रविड प्रत्येकवेळी देत असल्याचे आवेशने म्हटले आहे.

  आवेशने उत्कृष्ट कामगिरी केली

  नुकतेच भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेसाठी आवेश खानचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. आयपीएल 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना आवेशने 16 सामन्यात 24 विकेट घेतल्या. लीगमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तो दुसऱ्या क्रमांकावर होता. या दरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट - 7.37 आणि सर्वोत्तम कामगिरी - 3/13 होता.
  Published by:Dhanshri Otari
  First published: