मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ : T20 World Cup मधले 8 खेळाडू आऊट, रोहित कॅप्टन, पण विराटच्या RCB ला लॉटरी!

IND vs NZ : T20 World Cup मधले 8 खेळाडू आऊट, रोहित कॅप्टन, पण विराटच्या RCB ला लॉटरी!

टी-20 वर्ल्ड कपमधल्या (T20 World Cup) खराब कामगिरीनंतर टीम इंडियामध्ये (Team India) मोठे बदल करण्यात आले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी-20 मॅचच्या सीरिजपासून (India vs New Zealand) रोहित शर्मा (Rohit Sharma) टीमचा कॅप्टन असेल. रोहित कॅप्टन असला तरी मुंबई इंडियन्सच्या (Mumabi Indians) एकाही नव्या खेळाडूचा टीममध्ये समावेश करण्यात आलेला नाही. उलट विराट कोहलीच्या (Virat Kohli) आरसीबीची (RCB) टीममध्ये लॉटरी लागली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 9 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमधल्या (T20 World Cup) खराब कामगिरीनंतर टीम इंडियामध्ये (Team India) मोठे बदल करण्यात आले आहेत. टी-20 वर्ल्ड कप खेळलेले 8 खेळाडू न्यूझीलंडविरुद्धची सीरिज खेळणार नाहीत. टी-20 वर्ल्ड कप सुरू व्हायच्या आधीच विराट कोहलीने (Virat Kohli) आपण या फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडणार असल्याचं सांगितलं, त्यामुळे आता विराटऐवजी रोहित शर्माकडे (Rohit Sharma) टीमची कॅप्टन्सी देण्यात आली आहे, तर केएल राहुलला (KL Rahul) टीमचं उपकर्णधार करण्यात आलं आहे.

टी-20 वर्ल्ड कपसाठी टीममध्ये असलेले विराट कोहली, हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, राहुल चहर आणि शार्दूल ठाकूर हे न्यूझीलंडविरुद्धची टी-20 सीरिज खेळणार नाहीत. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) यांची टी-20 वर्ल्ड कपमधली कामगिरी निराशाजनक झाली. या दोघांच्या फिटनेसबाबतही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. हार्दिक पांड्याची टीममध्ये ऑलराऊंडर म्हणून निवड झाली होती, पण आयपीएलमध्ये दुखापतीमुळे हार्दिक बॉलिंग करू शकला नाही. तसंच टी-20 वर्ल्ड कपमध्येही हार्दिक बॉलिंग करेल का नाही, याबाबत सस्पेन्स होता. दुखापतीमुळे हार्दिकने टी-20 वर्ल्ड कपमध्येही फार बॉलिंग केली नाही. तर मिस्ट्री स्पिनर असलेल्या वरुण चक्रवर्तीला एकही विकेट मिळाली नाही.

मोहम्मद शमीने (Mohammad Shami) अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध विकेट घेतल्या असल्या तरी त्याचा इकोनॉमी रेट जास्त होता. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्येही शमीने जवळपास 10 रन प्रती ओव्हरच्या इकोनॉमी रेटने बॉलिंग केली आहे, त्यामुळे शमीचा पत्ताही कट झाल्याचं बोललं जातंय. टी-20 वर्ल्ड कपमध्ये एकच सामना खेळलेल्या राहुल चहरलाही बाहेर करण्यात आलं आहे.

दुसरीकडे विराट, बुमराह, जडेजा आणि शार्दूल हे इंग्लंड दौऱ्यापासून क्रिकेट खेळत आहेत, त्यामुळे त्यांना न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमधून विश्रांती देण्यात आली आहे.

नव्या चेहऱ्यांना संधी

आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाड, व्यंकटेश अय्यर, आवेश खान, हर्षल पटेल या नव्या चेहऱ्यांना टीममध्ये संधी देण्यात आली आहे. तर श्रेयस अय्यर आणि युझवेंद्र चहलचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. फॉर्ममध्ये नसलेल्या भुवनेश्वर कुमारने टीममधलं आपलं स्थान कायम ठेवलं आहे. आयपीएल 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या विजयात ऋतुराज गायकवाडचा मोलाचा वाटा होता. यंदाच्या आयपीएलमध्ये ऋतुराज सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता, तर व्यंकटेश अय्यरच्या ऑलराऊंड कामगिरीमुळे केकेआर फायनलमध्ये पोहोचली होती.

आरसीबी-दिल्लीला लॉटरी

न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजसाठी आयपीएलच्या आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स टीमच्या खेळाडूंना संधी मिळाली आहे. आरसीबीकडून खेळणारे युझवेंद्र चहल, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज यांचं टीममध्ये आगमन झालं आहे. तर दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारे अक्षर पटेल, आवेश खान यांनाही संधी मिळाली आहे.

भारतीय टीम

रोहित शर्मा, केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, ईशान किशन, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर.अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज

17 नोव्हेंबरपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तीन टी-20 मॅचच्या सीरिजला सुरुवात होत आहे. 19 नोव्हेंबरला दुसरी आणि 21 नोव्हेंबरला तिसरी टी-20 खेळवली जाईल. जयपूर, रांची आणि कोलकात्यामध्ये तीन टी-20 मॅच खेळवल्या जाणार आहेत.

First published:

Tags: Rohit sharma, Team india, Virat kohli