तत्पूर्वी, सलामीला खेळणाऱ्या रोहित शर्माने या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली. त्याने संजू सॅमसनला सलामीला खेळवलं. मात्र तो फक्त दोन धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली. लोकेश राहुलसोबत त्याने डाव सावरला. लोकेश राहुल 45 धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्माने अर्धशतक साजरं केलं. पण 60 धावांवर त्याला रिटायर्ड हर्ट व्हावं लागलं. त्यानंतर श्रेयस अय्यरने अखेरच्या षटकात फटकेबाजी केल्यानं संघाच्या 20 षटकांत 3 बाद 163 धावा झाल्या. श्रेयस अय्यर 33 धावांवर तर मनिष पांडे 11 धावांवर नाबाद राहिले. रोहित शर्माने अर्धशतक साजरं करताना विराटला मागे टाकलं आहे. रोहितचं टी20 मधील हे 25 वे अर्धशतक असून विराट कोहली 24 अर्धशतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या गुप्टिलने 17 अर्धशतके केली आहे. भारताने या सामन्यात विराट कोहलीला विश्रांती दिली आहे. त्याच्या जागी संजू सॅमसनला संधी दिली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा टी 20 सामना सुरू आहे. पहिले चार सामने जिंकल्यानंतर अखेरच्या सामन्यात विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व गाजवण्याची संधी भारताला आहे. भारताने याआधीचे सलग चार सामने तर जिंकलेच पण तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात तर सुपर ओव्हरचा थरारही जिंकला. न्यूझीलंडने आतापर्यंत मायदेशात तीन पेक्षा जास्त सामन्यांची टी20 मालिका कधीच गमावलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर अशी नामुष्की पहिल्यांदाच ओढावणार आहे. भारतासाठी ही मालिका महत्वाची आहे. सध्या आयसीसी टी20 क्रमवारीत भारत पाचव्या क्रमांकावर आहे. यात पाकिस्तान पहिल्या स्थानावर तर त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका यांचा नंबर लागतो. या क्रमवारीत वरचा क्रमांक पटकावण्यासाठी या मालिका विजयाचा फायदा होणार आहे. 21 व्या वर्षी जिंकली ऑस्ट्रेलियन ओपन, दिग्गजांना मागे टाकून रचला इतिहास5th T20I. It's all over! India won by 7 runs https://t.co/3a7zBdAcuu #NZvInd
— BCCI (@BCCI) February 2, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket