Home /News /sport /

असा रंगला सुपर ओव्हरचा थरार, रोहित शर्माने 2 चेंडूत फिरवला सामना

असा रंगला सुपर ओव्हरचा थरार, रोहित शर्माने 2 चेंडूत फिरवला सामना

न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या टी20 मध्ये सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने विजय मिळवून मालिकेत 3-0 ने विजयी आघाडी घेतली आहे.

    हॅमिल्टन, 29 जानेवारी : न्यूझीलंडमध्ये भारताने 12 वर्षांनी टी20 मालिका जिंकली आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसऱा सामना सुपर ओव्हरपर्यंत रंगला. यामध्ये भारताने बाजी मारताना सामन्यासह मालिका विजय साजरा केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 179 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडला 6 बाद 179 धावाच करता आल्या. त्यानंतर सुपर ओव्हरचा थरार रंगला. सुपरओव्हरमध्ये न्यूझीलंडकडून केन विल्यमसन आणि मार्टिन गुप्टिल मैदानात उतरले. 6 चेंडूत या दोघांनी 17 धावा केल्या.  जसप्रीत बुमराहने टाकलेल्या या षटकात पहिल्या चेंडूवर विल्यमसनने एकेरी धाव घेतली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर गुप्टिल एकच धाव घेऊ शकला. तिसऱ्या चेंडूवर विल्यमसनने षटकार आणि चौथ्या चेंडूवर चौकार मारला. पाचव्या चेंडूवर एक चोरटी धाव घेतली. सहाव्या चेंडूवर गुप्टीलने चौकार मारून संघाच्या 17 धावा केल्या. न्यूझीलंडने एका षटकात 18 धावांचे आव्हान भारताला दिले. भारताकडून रोहित शर्मा आणि केएल राहुल फलंदाजीला आले होते. न्यूझीलंडचा गोलंदाज टीम साउथीने गोलंदाजी केली. रोहित शर्माने पहिल्या चेंडूवर दोन धावा काढल्या आणि दुसऱ्या चेंडूवर फक्त एकच धाव काढता आली. त्यानंतर केएल राहुलने तिसऱ्या चेंडूवर चौकार खेचला. त्यावेळी भारताला तीन चेंडूत 11 धावांची गरज होती. चौथ्या चेंडूवर केएल राहुलने एक धाव काढली. पाचव्या चेंडूवर रोहितने षटकार मारल्यानंतर भारताला अखेरच्या चेंडूवर चार धावांची गरज होती. रोहित शर्माने षटकार मारून विजय मिळवून दिला. ऐतिहासिक विक्रम रचत युवा ब्रिगेडने मिळवलं सेमीफायनलचं तिकीट याआधी थरारक सामन्यात मोहम्मद शमीने अखेरच्या षटकात दोन विकेट घेत न्यूझीलंडला धक्का दिला. शेवटच्या ओव्हरमध्ये 9 धावांची गरज असताना शमीने केवळ 8 धावा दिल्या. भारतानं दिलेल्या 180 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना एकट्यानं 48 चेंडूत 95 धावा केल्या. केनने 197.92च्या स्ट्राईक रेटने 8 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीनं 95 धावा केल्या, केवळ 5 धावांची केनचे शतक हुकले. भारतानं दिलेल्या 180 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मार्टिन गुप्टिल आणि मुनरो यांनी 47 धावांची भागीदारी केली. त्यानंतर रवींद्र जडेजानं 6व्या ओव्हरमध्ये भारताला पहिले यश मिळवून दिले. मार्टिग गुप्टिल 31 धावांवर बाद झाल्यानंतर केन मैदानात आला. न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसनने आक्रमक फलंदाजी करत 28 चेंडुंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. केनने एकट्यानं न्यूझीलंडचा डाव सावरला. भारताकडून रवींद्र जडेजानं 2 विकेट घेत भारताच्या विजयासाठी प्रयत्न केला. थरारक सामन्यात मोहम्मद शमीने अखेरच्या षटकात दोन विकेट घेत न्यूझीलंडला धक्का दिला. IPLमध्ये धोनी, रोहित आणि विराट एकाच टीममध्ये खेळणार! गांगुलीचा मास्टर प्लॅन
    Published by:Suraj Yadav
    First published:

    पुढील बातम्या