मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ : कॅप्टन होताच रोहितचा विराटला धक्का, 'वर्ल्ड रेकॉर्ड' मोडत हिटमॅनने इतिहास घडवला!

IND vs NZ : कॅप्टन होताच रोहितचा विराटला धक्का, 'वर्ल्ड रेकॉर्ड' मोडत हिटमॅनने इतिहास घडवला!

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तिसऱ्या टी-20 मध्ये (India vs New Zealand 3rd T20) टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) इतिहास घडवला आहे.

  • Published by:  Shreyas

कोलकाता, 21 नोव्हेंबर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तिसऱ्या टी-20 मध्ये (India vs New Zealand 3rd T20) टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) इतिहास घडवला आहे. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर रोहित शर्मा आणि ईशान किशन (Ishan Kishan) यांनी पहिल्या ओव्हरपासूनच न्यूझीलंडच्या बॉलर्सवर आक्रमण केलं. रोहितने पहिल्याच ओव्हरमध्ये ट्रेन्ट बोल्टला लागोपाठ दोन फोर मारल्या, त्याने भारतीय इनिंगच्या 11 व्या ओव्हरमध्ये फोर मारत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. या अर्धशतकासह रोहितने विराट कोहलीचा (Virat Kohli) वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माने 30 वेळा 50 पेक्षा जास्तचा स्कोअर केला आहे. विराट कोहलीने 29 वेळा 50 पेक्षा जास्त स्कोअर केला आहे. या यादीत बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर आहे. बाबरने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 25 वेळा 50 प्लस स्कोअर केला आहे. डेव्हिड वॉर्नर आणि मार्टिन गप्टीलने 21 वेळा 50 रनपेक्षा जास्तचा आकडा गाठला. रोहित शर्माच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 4 शतकंही आहेत. एवढी शतकं करणारा रोहित एकमेव खेळाडू आहे.

रोहितने तिसऱ्या टी-20मध्ये 150 सिक्सही पूर्ण केल्या. या सामन्याआधी रोहितला हा रेकॉर्ड करण्यासाठी 3 सिक्सची गरज होती. या सामन्यात त्याने 31 बॉलमध्ये 56 रनची खेळी केली, ज्यात 3 सिक्स आणि 5 फोर लगावले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्सचा रेकॉर्ड न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टीलच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत 161 सिक्स मारले, तर क्रिस गेलने 124 सिक्स, इयन मॉर्गनने 119 आणि एरॉन फिंचने 113 सिक्स मारले.

या सीरिजमध्ये रोहित शर्माची बॅट चांगलीच तळपली. जयपूरमध्ये झालेल्या पहिल्या टी-20 मध्ये रोहितने 48 रन केले, यानंतर रांचीमध्ये त्याने 36 बॉलमध्ये 55 रन ठोकले, यात रोहितने 5 सिक्स आणि 1 फोर मारली. तसंच कोलकात्यामध्येही त्याने अर्धशतक केलं, म्हणजेच सीरिजमध्ये रोहितने दोन अर्धशतकं केली.

First published: