मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ : ईडन गार्डनमधून समोर आला धक्कादायक प्रकार, 11 जणांना पोलिसांनी केली अटक

IND vs NZ : ईडन गार्डनमधून समोर आला धक्कादायक प्रकार, 11 जणांना पोलिसांनी केली अटक

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand 3rd T20) यांच्यातल्या तिसऱ्या टी-20 मॅचवेळी कोलकात्याच्या ईडन गार्डनमधून (Eden Garden) 11 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand 3rd T20) यांच्यातल्या तिसऱ्या टी-20 मॅचवेळी कोलकात्याच्या ईडन गार्डनमधून (Eden Garden) 11 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand 3rd T20) यांच्यातल्या तिसऱ्या टी-20 मॅचवेळी कोलकात्याच्या ईडन गार्डनमधून (Eden Garden) 11 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

  • Published by:  Shreyas

कोलकाता, 21 नोव्हेंबर : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand 3rd T20) यांच्यातल्या तिसऱ्या टी-20 मॅचवेळी कोलकात्याच्या ईडन गार्डनमधून (Eden Garden) 11 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेले हे 11 जण तिकीटांचा काळाबाजार करत होते. त्यांच्याकडून तब्बल 60 तिकीटं सापडली असल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे. या घटनेनंतर ईडन गार्डन परिसरातली सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कोलकाता पोलिसांची वेगवेगळी युनिट, आरएफ आणि एचआरएफएस यांचे मिळून 2 हजार सुरक्षा रक्षक ईडन गार्डनमध्ये तैनात करण्यात आले आहेत.

ईडन गार्डनमध्ये दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामन्याचं आयोजन करण्यात येत आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे भारतामध्ये फार क्रिकेट खेळलं गेलं नव्हतं. आता कोरोना आटोक्यात आल्यामुळे पुन्हा एकदा ईडन गार्डनच्या ऐतिहासिक मैदानात क्रिकेटचं पुनरागमन झालं आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. रोहितने या सामन्यात केएल राहुल आणि आर.अश्विनला विश्रांती दिली. त्यांच्याऐवजी ईशान किशन आणि युझवेंद्र चहलला संधी देण्यात आली आहे. सीरिजच्या पहिल्या दोन्ही मॅच जिंकल्यामुळे भारताने सीरिज आधीच खिशात टाकली आहे.

या दिवसांमध्ये भारतात रात्रीच्या वेळी धुकं पडतं, त्यामुळे बॉल ओला होतो आणि बॉलर्ससाठी बॉल ग्रिप करणं कठीण असतं, त्यामुळे बहुतेकवेळा कर्णधार टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतात. रोहितनेही पहिल्या दोन्ही सामन्यात टॉस जिंकून पहिले बॉलिंगच घेतली होती, पण सीरिजचा निर्णय आधीच भारताच्या बाजूने लागल्यामुळे तसंच बॉलर्सना या वातावरणात बॉलिंगचा सराव व्हावा म्हणून रोहितने पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला.

केएल राहुल हा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, मागच्या 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये राहुलने 4 अर्धशतकं केली आहेत, तर अश्विनने टी-20 वर्ल्ड कपमधून या फॉरमॅटमध्ये पुनरागमन केलंय. राहुल आणि अश्विन यांना यानंतर दोन टेस्ट मॅचची सीरिजही खेळायची आहे, त्यामुळे त्यांना विश्रांती देण्यात येत आहे.

पहिल्या दोन सामन्यांमध्ये कर्णधार असलेला न्यूझीलंडचा टीम साऊदी या सामन्यात खेळत नाहीये, त्याच्याऐवजी मिचेल सॅण्टनरकडे किवी टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे. या मॅचनंतर दोन्ही टीममध्ये 2 टेस्ट मॅचची सीरिज खेळवण्यात येत आहे.

First published: