मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

रोहितचा दुष्काळ संपला, गिलचा वर्षाव सुरूच; टीम इंडियाचा डबल धमाका!

रोहितचा दुष्काळ संपला, गिलचा वर्षाव सुरूच; टीम इंडियाचा डबल धमाका!

भारत विरुद्ध वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शतक टोकले आहे.

भारत विरुद्ध वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शतक टोकले आहे.

इंदोर येथील होलकर स्टेडियमवर हा सामना खेळवला जात असून यात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी 201 धावांची नाबाद भागीदारी केली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोघांनी देखील आपले शतक पूर्ण केले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Pawar

मुंबई, 24 जानेवारी : आज भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात वनडे मालिकेतील तिसरा सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल याने दमदार शतक ठोकले आहे. इंदोर येथील होलकर स्टेडियमवर हा सामना खेळवला जात असून यात आतापर्यंत रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी 201 धावांची नाबाद भागीदारी केली.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळवलेला पहिला सामना भारताने 12 धावांनी जिंकला होता. तर रायपूर येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यातही भारताने न्यूझीलंडला गुडघे टेकायला भाग पाडले आणि 8 विकेट्सने सामना जिंकला. आता श्रीलंकेनंतर भारत कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाला देखील व्हाईट वॉश देण्याच्या तयारीत आहे.

रोहित शर्मा याने 83 चेंडूत 100 धावा केल्या आहेत. त्याने शतक ठोकत असताना 6 षटकार आणि 9 चौकार ठोकले. बऱ्याच काळानंतर रोहित शर्माच्या बॅटमधून हे शतक निघाले असून हे वनडे मालिकेतील त्याचे 30 वे शतक आहे. तर आंतरराष्ट्रीय मालिकेतील रोहितचे हे 43 वे शतक आहे. परंतु शतक ठोकल्यानंतर रोहित शर्माची न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी विकेट घेतली.

युवा क्रिकेटर शुभमन गिल हा देखील थांबण्याचे नाव घेत नाही. रोहित पाठोपाठ शुभमनने देखील 72 चेंडूत 101 धावा केल्या आहेत. शुभमनने 72 चेंडूत 13 चौकार आणि 4 षटकार ठोकत शतक पूर्ण केले. या सोबतच शुभमनचे आंतरराष्ट्रीय मालिकेतील हे 5 वे शतक आहे. त्याने न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यातही द्विशतकीय कामगिरी केली होती.

हे ही वाचा  :मोहम्मद शमीला न्यायालयाचा दणका! विभक्त पत्नीला दरमहा द्यावे लागणार लाखो रुपये

 वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्याची नाणेफेक न्यूझीलंड संघाने जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भेदक गोलंदाजी करून भारतीय फलंदाजांना लवकरात लवकर बाद करण्याचा सापळा न्यूझीलंडने आखला होता. परंतु भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या या योजनेला हाणून पाडले. आतापर्यंत भारताची धाव संख्या 200 पार गेली असून न्यूझीलंडचे गोलंदाज भारतीय संघाची केवळ १ विकेट काढण्यात यशस्वी ठरले आहेत.

First published:

Tags: Cricket, Cricket news, Rohit sharma, Shubhman Gill, Team india