मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs NZ 2nd Test : विराटची टीममध्ये एण्ट्री, Playing XI मधून कोण Out? कॅप्टननेच दिलं उत्तर

IND vs NZ 2nd Test : विराटची टीममध्ये एण्ट्री, Playing XI मधून कोण Out? कॅप्टननेच दिलं उत्तर

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टला (India vs New Zealand 2nd Test) शुक्रवारपासून मुंबईत सुरूवात होत आहे. भारतीय टीममध्ये कर्णधार विराट कोहलीचं (Virat Kohli) पुनरागमन झालं आहे, त्यामुळे भारतीय टीममध्ये बदल होणार आहेत.

पुढे वाचा ...

मुंबई, 2 डिसेंबर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टला (India vs New Zealand 2nd Test) शुक्रवारपासून मुंबईत सुरूवात होत आहे. या सामन्याआधी मुंबईमध्ये पाऊस पडत आहे, त्यामुळे याचा परिणाम मॅचसोबतच प्लेयिंग-11 निवडतानाही होणार आहे. टेस्ट टीममध्ये पुनरागमन करणाऱ्या कॅप्टन विराट कोहलीनेच (Virat Kohli) याचे संकेत दिले आहेत. विराटला दुसऱ्या टेस्टमधल्या प्लेयिंग-11 बाबत विचारण्यात आलं, तेव्हा त्याने मुंबईत मागचे तीन दिवस पाऊस पडत आहे, दोन्ही टीमना मैदानात सराव करता आलेला नाही. खेळपट्टीही दोन दिवस झाकून ठेवली आहे, त्यामुळे खेळपट्टीवर ओलावा असेल, ज्याचा फायदा फास्ट बॉलर घेऊ शकतात, असं विराट म्हणाला.

स्वत:च्या कमबॅकनंतर कोणता खेळाडू टीमबाहेर जाणार, याचा खुलासा करायला विराटने नकार दिला. पाऊस, वातावरण आणि खेळपट्टी बघून मॅचच्या दिवशी शुक्रवारी प्लेयिंग-11 बाबतचा निर्णय घेतला जाईल, असं विराटने सांगितलं.

टी-20 वर्ल्ड कपनंतर विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती, त्यामुळे तो न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-20 मॅचची सीरिज आणि कानपूरमध्ये झालेली पहिली टेस्ट खेळला नव्हता. या टेस्टमध्ये अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) टीमचं नेतृत्व केलं होतं, तर श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आपल्या पहिल्याच टेस्टमध्ये अय्यरने शतक आणि अर्धशतक केलं. अय्यरच्या या कामगिरीमुळे त्याला टीममधून बाहेर करणं कठीण होणार आहे.

रहाणे-पुजाराचा फॉर्म चिंतेचा विषय

कोहलीने प्लेयिंग-11 बाबत काहीही प्रतिक्रिया दिली नसली तरी त्याने सूचक इशारा केला. टीम सध्या कुठे आहे आणि टीमसाठी कोणतं कॉम्बिनेशन योग्य आहे, ते तुम्हाला समजलं पाहिजे, त्यामुळे जर एखाद्या खेळाडूला बाहेर केलं जात असेल तर त्याच्यासोबत बोललं गेलं पाहिजे, असं विराट म्हणाला. मागच्या कामगिरीकडे बघितलं तर अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) यांच्यापैकी एक जण बाहेर बसेल. रहाणे आणि पुजाराची मागच्या 12 महिन्यांमधली कामगिरी निराशाजनक झाली आहे, पण रहाणे टीमचा उपकर्णधार आहे आणि पुजाराच्या क्षमतेवर कोच राहुल द्रविडला विश्वास आहे.

First published:

Tags: New zealand, Team india, Virat kohli