मुंबई, 7 डिसेंबर: भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडवर 372 धावांनी विजय(IND vs NZ) मिळवून दोन सामन्यांची मालिका 1-0 अशी जिंकली. या विजयानंतर टीम इंडियाच्या आणखी एका कृतीने सर्वाचे मन जिंकले आहे. संघाची कृती पाहून शिष्यांचे गुरुच्या पावलावर पाऊल अशी(Team India Gift To Ground Staff For Pitching In Mumbai Wankhede Stadium) चर्चा क्रिकेट जगतात रंगली आहे.
न्यूझीलंडविरुद्ध सामना संपल्यानंतर टीम इंडियाने वानखेडे स्टेडियमच्या ग्राउंड्समनला 35,000रुपये दिले. आव्हानात्मक ट्रॅक आणि खेळपट्टी तयार केल्याबद्दल कौतुक म्हणून ही रक्कम देण्यात आली.
द्रविड प्रशिक्षकपदी आल्यावर भारतीय संघात काही सकारात्मक बदलही पाहायला मिळाले. यापूर्वी, कानपूर कसोटीत हातचा सामना गमावल्यानंतर राहुल द्रविडने स्पोर्टिंग खेळपट्टी तयार करणाऱ्या ग्राऊंड्समनला स्वतःच्या खिशातून 35 हजार रुपये दिले होते. आणि ग्राऊंड स्टाफचे कौतुकही केले होते.
त्याच्या या कृतीनंतर आता संघानेही त्याच्या पावलावर पाऊल ठेवत द्रविडने सुरु केलेली ही परंपरा कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे. टीम इंडियामधील हा सकारात्मक बदल पाहून शिष्यांचे गुरुच्या पावलावर पाऊल अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.
राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकपदी विराजमान झाल्यानंतरच्या पहिल्याच मालिकेत भारतानं टी-20 मध्ये न्यूझीलंडवर 3-0 असा आणि कसोटीत 1-0 असा विजय मिळवला. मुंबई कसोटीतील विजयासह भारत कसोटी क्रिकेटमधील नंबर वन संघ बनला आहे. त्यांनी न्यूझीलंडकडून अव्वल स्थान हिसकावून घेतले. किवी संघाने जून 2021 मध्ये भारताकडून हा मान हिरावून घेतला होता आणि त्यानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकून आपले स्थान पक्के केले होते. पण आता टीम इंडियाने बदला घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Team india