मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs NZ 2nd Test : मयंकच्या शतकामुळे टीम इंडिया संकटातून बाहेर, विराट-पुजारा पुन्हा फेल!

IND vs NZ 2nd Test : मयंकच्या शतकामुळे टीम इंडिया संकटातून बाहेर, विराट-पुजारा पुन्हा फेल!

Photo-BCCI

Photo-BCCI

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs New Zealand 2nd Test) ओपनर मयंक अग्रवालने (Mayank Agarwal Century) खणखणीत शतक केलं आहे.

मुंबई, 3 डिसेंबर : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs New Zealand 2nd Test) ओपनर मयंक अग्रवालने (Mayank Agarwal Century) खणखणीत शतक केलं आहे. मयंकचं टेस्ट क्रिकेटमधलं हे चौथं शतक आहे. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियाला संकटातून बाहेर काढलं आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 221/4 एवढा झाला आहे. मयंक अग्रवाल 120 रनवर आणि ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) 25 रनवर खेळत आहे.

या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane), रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि इशांत शर्मा (Ishant Sharma) यांना दुखापत झाल्यामुळे तिघांनाही टीमबाहेर बसावं लागलं. विराट कोहलीने विश्रांतीनंतर टीम इंडियात पुनरागमन केलं आहे, त्यामुळे त्याने अजिंक्य रहाणेची जागा घेतली. तर रविंद्र जडेजाऐवजी जयंत यादव (Jayant Yadav) आणि इशांत शर्माऐवजी मोहम्मद सिराजला (Mohammad Siraj) संधी देण्यात आली.

टॉस जिंकून पहिले बॅटिंगला आल्यानंतर टीम इंडियाचे ओपनर मयंक अग्रवाल आणि शुभमन गिल (Shubhaman Gill) यांनी चांगली सुरुवात केली. या दोघांमध्ये 80 रनची पार्टनरशीप झाली, पण शुभमन गिल 44 रनवर आऊट झाला. यानंतर लगेचच चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि विराट कोहली आऊट झाले. एजाझ पटेलने (Ajaz Patel) पुजारा आणि विराटला शून्य रनवर माघारी पाठवलं. पुजारा आणि विराट यांचा मैदानातला संघर्ष या सामन्यातही दिसला. मागच्या दोन वर्षांमध्ये या दिग्गजांना एकही शतक करता आलेलं नाही. विराट कोहलीच्या विकेटमुळे मात्र मैदानात वाद झाला.

IND vs NZ : आऊट का नॉट आऊट? विराटच्या विकेटनंतर मोठा वाद

भारताची अवस्था 80/0 असताना काही मिनिटांमध्येच 80/3 झाली. यानंतर मयंक अग्रवालने श्रेयस अय्यरसोबत (Shreyas Iyer)  80 रनची पार्टनरशीप केली, पण श्रेयस अय्यर 18 रन करून आऊट झाला. आता मयंक आणि ऋद्धीमान साहा यांच्यात नाबाद 61 रनची पार्टनरशीप झाली आहे. न्यूझीलंडकडून स्पिनर एजाझ पटेल यानेच सगळ्या 4 विकेट घेतल्या आहेत.

मुंबईमधल्या खराब वातावरणामुळे या टेस्टच्या पहिल्या सत्राचा खेळ होऊ शकला नाही. दिवसभरात 70 ओव्हरचाच खेळ होऊ शकला.

First published: