मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ 2nd Test Series: दिवसाअखेर न्यूझीलंडचा अर्धा संघ माघारी, Team India विजयाच्या उंबरठ्यावर

IND vs NZ 2nd Test Series: दिवसाअखेर न्यूझीलंडचा अर्धा संघ माघारी, Team India विजयाच्या उंबरठ्यावर

team india

team india

भारत आणि न्यूझीलंड(IND vs NZ 2nd Test Series ) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस आहे

    मुंबई, 5 डिसेंबर: भारत आणि न्यूझीलंड(IND vs NZ 2nd Test Series ) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी भारताने 539 धावांचा भला मोठा डोंगर किवींसमोर ठेवला होता. हा पार करताना दिवसाअखेर किवींना 5 बाद 140 धावांपर्यंत मजल मारता आली आहे. विजयासाठी न्यूझीलंडला दोन दिवसात 400 धावांची आवश्यकता आहे. तर भारताला पाच विकेट्सची गरज आहे. पहिल्या डावात भारताने 325 धावांपर्यत मजल मारली होती. त्याच्या प्रत्युत्तरात खेळणारा न्यूझीलंडचा संघ 62 धावांत गारद झाला. त्यानंतर भारताने न्यूझीलंडला फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने दुसरा डाव 7 बाद 276 धावांवर घोषित केला आणि न्यूझीलंडला 540 धावांचं लक्ष्य दिलं. 540 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडने दिवसअखेर 5 बाद 140 धावांपर्यंत मजल मारली आहे. भारताने 7 बाद 276 धावांवर डाव घोषित केला आहे. त्यामुळे न्यूझीलंडसमोर आता 540 धावांचं लक्ष्य आहे. हे आव्हान पुरे करताना भारताच्या गोलंदाजांनी किवींची चांगलीच दमछाक केली.  न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात निराशाजनक राहिली. भारताचा फिरकीपटू रवीचंद्नन अश्विनने किवींना पहिला धक्का देत टॉम लॅथमला 6 धावांवर बाद केले. त्यानंतर सलामीवीर विल यंगला 20 धावांवर असताना झेलबाद केलं. आर अश्विननं ही विकेट घेतली आणि त्यानंतर लगेचंच टी ब्रेक घ्यावा लागला. स्पायडर कॅमेरा मैदानावर अडकल्यानं 15 मिनिटे आधीच ब्रेक घ्यावा लागला. टी ब्रेकनंतर आर अश्विननं किवींना आणखी दोन धक्के दिले. डॅरेल मिचेलने 76 चेंडू 51 धावा फटकावत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. 30 व्या षटकात उमेश यादवला सलग दोन चौकार लगावत त्याने हाफ सेंच्युरी साजरी केली. रवीचंद्नन अश्विनने रॉस टेलरला 6 धावांवर असताना चेतेश्वर पुजाराकरवी झेलबाद केल. त्यावेळी किवींना तिसरा धक्का बसला होता. अक्षर पटेलने भारताला चौथी आणि महत्त्वाची विकेट मिळून दिली आहे. त्याने डॅरेल मिचेलला 60 धावांवर असताना जयंत यादव करवी झेलबाद केलं. हेन्री निकोल्स 36 आणि रचिन रवींद्र 2 धावा करून खेळत होते. न्यूझीलंडनं तिसऱ्या दिवसअखेर 5 बाद 140 धावा केल्या आहेत आणि त्यांना विजयासाठी दोन दिवसांत 400 धावा बनवायच्या आहेत. भारताला मालिका खिशात घालण्यासाठी 5 विकेट्स हव्या आहेत.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    पुढील बातम्या