Home /News /sport /

INDvsNZ : न्यूझीलंडविरुद्ध ख्राइस्टचर्च कसोटीत टीम इंडियाचे 11 खेळाडू करणार 'पदार्पण'

INDvsNZ : न्यूझीलंडविरुद्ध ख्राइस्टचर्च कसोटीत टीम इंडियाचे 11 खेळाडू करणार 'पदार्पण'

न्यूझीलंडविरुद्ध पहिली कसोटी गमावल्यानंतर आता दुसऱ्या कसोटीत भारतीय संघासमोर मोठं आव्हान असणार आहे.

    ख्राइस्टचर्च , 28 फेब्रुवारी : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दारूण पराभव झाल्यानंतर टीम इंडिया दुसऱ्या कसोटीसाठी सज्ज झाली आहे. न्यूझीलंड दौऱ्यात भारताचा कर्णधार आणि जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज असलेल्या विराट कोहलीला फक्त एक अर्धशतक करता आलं. वेलिंग्टनमध्ये पराभव झाल्यानंतर ख्राइस्टचर्चमध्ये उतरणं टीम इंडियाला आव्हानात्मक असणार आहे. वेगवान गोलंदाजीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाज कसे तग धरतात हे महत्वाचं ठरणार आहे. वेलिंग्टन कसोटीत भारताच्या खेळाडूंना वाऱ्यामुळे आणि उसळी घेणाऱ्या चेंडूंचा सामना करावा लागला होता. तर ख्राइस्टचर्च इथं दोन आव्हानं आहेत. या मैदानावर टीम इंडियाच्या एकाही खेळाडूने सामना खेळलेला नाही. म्हणजेच टीम इंडियाचे या मैदानावर कसोटी पदार्पणच होणार आहे. अशा परिस्थितीत न्यूझीलंडच्या वेगवान माऱ्याचा सामना करण्याचं आव्हान भारतीय फलंदाजांसमोर असेलं. ख्राइस्टचर्चवर आतापर्यंत 6 सामने झाले आहेत. त्यात न्यूझीलंडने लंकेविरुद्ध दोन, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, इंग्लंड, बांगलादेश यांच्याविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळला आहे. बांगलादेशविरुद्धचा एक सामना रद्द झाला होता. या मैदानावर पहिला सामना 2014 मध्ये झाला होता. न्यूझीलंडने तो सामना 8 गडी राखून जिंकला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर न्यूझीलंडने पाकिस्तान, बांगलादेश आणि लंकेला पराभूत केलं होतं. भारतीय गोलंदाजांना या मैदानावर लक्ष्य केलं जाण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांच्या माऱ्यासमोर उभा राहणं टीम इंडियाला कठिण जाऊ शकतं. शॉर्ट पिच गोलंदाजी करण्यात तरबेज असलेल्या नील वॅगनरचे संघात पुनरागमन झालं आहे. त्याच्या साथीला टिम साउदी, ट्रेंट बोल्ट आणि काइल जेमीसन असणार आहेत. टीम इंडियात होऊ शकतो बदल सलामीच्या जोडीकडून होणाऱ्या बचावात्मक फंदाजीचा परिणाम मधल्या फळीवर पडतोय. त्यामुळे सलामीला पृथ्वी शॉला संधी मिळेल आणि तो तयार असल्याचंही म्हटलं जात आहे. कर्णधार विराट कोहलीसोबत त्यानं नेटमध्येही सराव केला. दुसऱ्या बाजुला पहिल्या कसोटीत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या इशांत शर्माला दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीत बाहेर रहावं लागण्याची शक्यता आहे. टीम इंडियात रविचंद्रन अश्विनच्या जागी जडेजाला संधी मिळू शकते. तर इशांत शर्मा खेळू शकला नाही तर उमेश यादव संघात जागा मिळवू शकतो. एवढंच नाही तर शुभमन गिलला हनुमा विहारीच्या जागी संधी मिळू शकते. न्यूझीलंड 4 वेगवान गोलंदाज खेळवणार वेगवान गोलंदाजीला पोषक अशी खेळपट्टी असल्यानं न्यूझीलंड चार वेगवान गोलंदाजांना खेळवू शकते. वॅगनरच्या पुनरागमनामुळे न्यूझीलंडसमोर कोणाला बाहेर बसवायचं असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र फिरकीपटूऐवजी वेगवान गोलंदाजीवर न्यूझीलंड भर देण्याची शक्यता आहे. वाचा : टीम इंडियाला सगळ्यात मोठा झटका, सामन्याआधीच फॉर्ममध्ये असलेले गोलंदाज संघाबाहेर ख्राइस्टचर्च इथल्या मैदानावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर आहे. न्यूझीलंडने 2018 मध्ये लंकेविरुद्ध 4 बाद 585 धावा केल्या होत्या. त्याच सामन्यात सर्वात कमी धावा करण्याची नोंद लंकेच्या नावावर झाली होती. त्यांचा संघ दुसऱ्या डावात 104 धावांत गुंडाळला होता. न्यूझीलंडचा संघ : केन विलियमसन, टॉम ब्लंडेल, टॉम लाथम, हेन्री निकोलस, रॉस टेलर, कोलिन डी ग्रँडहोम, बीजे वाटलिंग, काइल जॅमीसन, टिम साउदी, ट्रेंट बोल्ट, नील वॅगनर, एजाज पटेल भारताचा संघ  : विराट कोहली (कप्तान), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशांत शर्मा, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, शुभमन गिल, उमेश यादव, नवदीप सैनी, ऋद्धिमान साहा. वाचा : …तर विराटने IPL सोडावे, दिग्गज क्रिकेटपटू कॅप्टन कोहलीवर भडकला
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या