Home /News /sport /

IND vs NZ : विराट टीममध्ये येताच बदलला कोच द्रविडचा 'रोल'!

IND vs NZ : विराट टीममध्ये येताच बदलला कोच द्रविडचा 'रोल'!

Photo-BCCI

Photo-BCCI

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टला (India vs New Zealand 2nd Test) शुक्रवारपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरूवात होत आहे. या सामन्यातून कर्णधार विराट कोहलीचं (Virat Kohli) टीममध्ये पुनरागमन झालं आहे.

    मुंबई, 2 डिसेंबर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टला (India vs New Zealand 2nd Test) शुक्रवारपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरूवात होत आहे. या सामन्यातून कर्णधार विराट कोहलीचं (Virat Kohli) टीममध्ये पुनरागमन झालं आहे. टी-20 वर्ल्ड कपनंतर विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती, त्यामुळे तो न्यूझीलंडविरुद्धची तीन टी-20 मॅचची सीरिज आणि कानपूरमध्ये झालेली पहिली टेस्ट खेळला नव्हता. पहिल्या टेस्टमध्ये विराटऐवजी अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) टीमचं नेतृत्व केलं होतं. भारतीय टीममध्ये पुनरागमन होताच विराट कोहलीने सरावाला सुरूवात केली आहे. सराव करत असताना विराट कोहलीला टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी थ्रो केले. याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेयर केला आहे. राहुल द्रविड टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर विराट आणि त्यांची ही पहिलीच मॅच आहे. टी-20 वर्ल्ड कपनंतर रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपला होता. यानंतर शास्त्री यांनी पुन्हा या पदासाठी अर्ज न करण्याचा निर्णय घेतला.
    कोणाला संधी? विराट कोहलीच्या पुनरागमनानंतर टीममध्ये बदल होणार हे निश्चित आहे, पण डच्चू कोणाला द्यायचा हा निर्णय घेताना कोहली आणि द्रविडची डोकेदुखी वाढणार आहे. कानपूरमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमधून श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) भारताच्या टेस्ट टीममध्ये पदार्पण केलं होतं. अय्यरने या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये शतक आणि दुसऱ्या इनिंगमध्ये अर्धशतक केलं. हा विक्रम करणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू आहे. श्रेयस अय्यरच्या या फॉर्ममुळे त्याला टीममधून काढणं मुश्किल झालं आहे. रहाणे-पुजाराचा फॉर्म चिंतेचा विषय अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि मयंक अग्रवाल (Mayank Agarwal)हे तीन खेळाडू सध्या खराब फॉर्ममध्ये आहेत. रहाणे आणि पुजाराची मागच्या 12 महिन्यांमधली कामगिरी निराशाजनक झाली आहे, पण रहाणे टीमचा उपकर्णधार आहे आणि पुजाराच्या क्षमतेवर कोच राहुल द्रविडला विश्वास आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Rahul dravid, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या