मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs NZ 2nd Test : कोरोनाच्या भीतीमध्ये मुंबई टेस्टवर नवीन संकट, भारताला बसणार मोठा धक्का!

IND vs NZ 2nd Test : कोरोनाच्या भीतीमध्ये मुंबई टेस्टवर नवीन संकट, भारताला बसणार मोठा धक्का!

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand Mumbai Test) यांच्यात 3 डिसेंबरपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दुसरी आणि शेवटची टेस्ट मॅच सुरू होणार आहे, पण हा सामना संकटात सापडला आहे.

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand Mumbai Test) यांच्यात 3 डिसेंबरपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दुसरी आणि शेवटची टेस्ट मॅच सुरू होणार आहे, पण हा सामना संकटात सापडला आहे.

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand Mumbai Test) यांच्यात 3 डिसेंबरपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दुसरी आणि शेवटची टेस्ट मॅच सुरू होणार आहे, पण हा सामना संकटात सापडला आहे.

मुंबई, 1 डिसेंबर : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand Mumbai Test) यांच्यात 3 डिसेंबरपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दुसरी आणि शेवटची टेस्ट मॅच सुरू होणार आहे, पण हा सामना संकटात सापडला आहे. मुंबईमध्ये बुधवार म्हणजेच आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. या कारणामुळे भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही टीमना आपलं सराव सत्र रद्द करावं लागणार आहे. पावसामुळे वानखेडे स्टेडियमची खेळपट्टीही झाकून ठेवण्यात आली आहे. भारत आणि न्यूझीलंडच्या टीम कानपूरहून मंगळवारी दुसऱ्या टेस्टसाठी मुंबईत आल्या आहेत.

एक्युवेदरच्या रिपोर्टनुसार मुंबईमध्ये बुधवारी दुपारनंतर अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. संध्याकाळी तर 50 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. तसंच समुद्राजवळच्या भागात पाणी साठण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. तसंच गुरुवारीदेखील संध्याकाळी जोरात पाऊस पडू शकतो आणि वातावरण ढगाळ राहू शकतं.

शुक्रवारपासून भारत-न्यूझीलंड यांच्यात दुसरी टेस्ट सुरू होणार आहे, पण या टेस्टच्या तयारीवर पावसाने पाणी फिरवलं आहे. आधीच कोरोनाच्या भीतीमुळे मुंबई टेस्टमध्ये फक्त 25 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये बसून मॅच पाहता येणार आहे, त्यात आता निसर्गानेही धक्का दिला आहे. दिलासादायक बाब म्हणजे मॅचच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी मोसम साफ असणार आहे. याचवर्षी अरबी समुद्रात आलेल्या वादळामुळे मुंबईच्या वानखेडे स्टेडियमचं मोठं नुकसान झालं होंत. स्टेडियमची साईट स्क्रीन पूर्णपणे तुटली होती.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूरमध्ये झालेली पहिली टेस्ट रोमांचकरित्या ड्रॉ झाली होती. न्यूझीलंडला भारताने 284 रनचं आव्हान दिलं होतं, पण शेवटच्या विकेटने किवी टीमला वाचवलं. रचिन रविंद्र आणि एजाझ पटेल यांच्या जोडीने शेवटपर्यंत झुंज दिली. आपली पहिलीच टेस्ट खेळणाऱ्या रचिन रविंद्रने 91 बॉल खेळले, तर एजाझने 23 बॉलचा सामना केला. शेवटच्या विकेटसाठी या जोडीने 52 बॉलचा सामना केला.

पहिली टेस्ट ड्रॉ झाल्यानंतर दुसऱ्या टेस्टमध्ये जर पावसाने खेळ खराब केला तर याचा सगळ्यात मोठा फटका भारताला बसेल, कारण ही टेस्ट सीरिज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा भाग आहे. पहिली टेस्ट ड्रॉ झाल्यामुळे भारताच्या पॉईंट्समध्ये मोठं नुकसान झालं आहे. भारतात होणारी टेस्ट म्हणजे टीम इंडियासाठी हमखास पॉईंट्स मिळवण्याची संधी असते, पण किवी टीमने भारताच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास पहिल्या टेस्टमधून हिरावून घेतला.

First published:
top videos